Nagpur Rada Curfew News 
महाराष्ट्र

Nagpur Curfew : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठा राडा, जमावबंदीचे आदेश, ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर मनाई

Curfew Imposed in Nagpur Clash News : सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला. औरंगाजेबच्या कबरीवरून राडा झाल्याचे समजतेय. ४० पोलीस जखमी झाले आहे. नागपूर आयुक्तांकडून शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Nagpur Rada Curfew News : औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे उपराजधानी नागपूरमध्ये हिंसाचार उफळला सोमवारी दोन गटामध्ये जोरदार राडा झाला, त्यानंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. सध्य नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैणात करण्यात आला आला आहे. सोमवारी रात्री संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. पोलिसांकडून सध्या नागपूरमध्ये जमावबंदी आणि मनाई आदेश लावण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत नागपूर शहरात संचारबंदी लागू झाली आहे. दरम्यान, नागपूरमधील दंगल झाल्याचे समजताच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांततेचं आवाहन केलेय.

नागपूरमध्ये जमावंबदी -

नागपूर शहरात पोलीस विभागाचा परिमंडळ 3, 4 आणि पाच मधील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशावरून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी मध्य रात्री पासून पुढील आदेशपपर्यंत संचारबंदी असणार लागू असेल.

सोमवारी सायंकाळी विशेष समाजाच्या लोकांनी गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 15 डिसेंबर लोकांनी इंग्रजांनी मंडळी जमा करून पोलिसांवर दगडफेक केली तसेच लोकांच्या जीवदान धोका निर्माण होऊन शांततेला बाधा निर्माण झाल्यानं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात परिमंडळ 3 मधील - कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, तहसील, लाकडगंज, शांती नगर, परिमंडळ 4 मधील- सक्करदारा, नंदनवन, इमामावडा परिमंडळ - 5 मधील यशोधरा नगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. या भागांमध्ये वैदकीय कारणा व्यतिरिक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. कोणतेही प्रकारच्या अफवा पसरवता येणार नाही.

अकोल्यातल्या अति संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढला..

नागपुरात झालेल्या दोन गटातील वादाचे पडसाद इतर जिल्ह्यात उमटू नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी राज्यातल्या अनेक संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.. अकोल्यातल्यातही अति संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहर पेठ, पोळा चौक, भांडपुरा आणि अकोटफैल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे.. आरसीपी आणि एसआरपी त्याशिवाय दंगल नियंत्रण पथके इथे तैनात करण्यात आले आहेत. याच परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात दंगली उफाळून आले होते.

नागपूर येथे हिंसाचारानंतर अमरावती शहर अलर्ट

अमरावती शहरात देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतला. तर शहरात ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.. नागपूर मध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेच आवाहन करत कुणीही अफ़वा पसरू नये,तर अमरावती शहरात शांतता आहे कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT