NAGPUR GANG LEADER’S WIFE DIES MYSTERIOUSLY Saam TV News
महाराष्ट्र

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Ippa Gang Nagpur Crime News: नागपूरच्या कुख्यात टोळीप्रमुखाच्या पत्नीचा मृत्यू संशयास्पद असल्याने अर्शद टोपीवर अवैध संबंध आणि हत्येचा आरोप; पोलिस तपास सुरू, टोळीत तणाव निर्माण.

Bhagyashree Kamble

नागपूरच्या गुन्हेगारी जगतातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुख्यात इप्पा टोळीच्या प्रमुखाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अर्शद टोपी या गुंडावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्याच्यावर मृत महिलेबरोबर अनैतिक संबंध होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं घडलं काय?

गुरूवारी टोपी आणि संबंधित महिला दुचाकीवरून बाहेर गेले. वाटेत एका जेसीबी मशीनने त्यांना धडक दिली. टोपीला किरकोळ दुखापत झाली. परंतु, महिला गंभीर जखमी झाली. महिलेला खासगी रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला तातडीने दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेही तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

शेवटी टोपीने रूग्णवाहिका चालकाला पैसे दिले आणि महिलेला नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, शुक्रवारी सकाळी महिलेचा उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच इप्पा टोळीमधील ४० हून अधिक सदस्य संतापले. दरम्यान, खासगी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी महिलेसोबत अर्शद दिसत आहे.

यानंतर इप्पा टोळीने अर्शदला संपवण्यासाठी प्लॅन आखण्यास सुरूवात केली. परिस्थिती गंभीर होताच अर्शद टोपीने पारडी येथील झोनल डीसीपी निकेतन कदम यांच्या कार्यालयात धाव घेतली. तसेच स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली. पोलिसांनी त्याला कोराडी पोलीस ठाण्यात हलवून त्याचा जबाब नोंदवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात महिलेचा मृत्यू अपघाती असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तपासातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT