Nagpur Crime x
महाराष्ट्र

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Nagpur : नागपूरमध्ये एका ५५ वर्षीय महिलेची निर्घुण हत्या करण्यात आली. मुलगा आणि सून मुंबईहून परतल्यानंतर त्यांना महिलेचा मृतदेह घरात आढळला. या घटनेचा तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

Yash Shirke

  • नागपूरमध्ये ५५ वर्षीय महिलेची हत्या.

  • घरात आढळून आला महिलेचा मृतदेह.

  • वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nagpur Crime News : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ५५ वर्षीय महिलेची निर्घुण हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह तिच्या घरात पडून होता. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका महिलेची उशीने गळा दाबून हत्या करण्यात आली. तिचा मुलगा आणि सून हे मुंबईला राहतात. ते नागपूरला त्यांच्या घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आला. तोपर्यंत महिलेचा मृतदेह तिच्या घरात तसाच पडून होता.

सुनीता मधुकर भोयर असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुनीता भोयर या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेनापती नगर येथील रहिवाशी आहेत. सुनीता यांची त्यांच्या घरातच गळा दाबून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. मारेकरी हा परिचयातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

सुनीता यांचा मुलगा आणि सून मुंबईहून घरी परतल्यावर त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा घरात मृतदेह आढळून आला. दोघांनी लगेचच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पंचनामा केला असता उशीने गळा आवळून त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा तपास वाठोडा पोलीस करत आहेत. या मृत्यू प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT