Nagpur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: बारावीच्या विद्यार्थिनीशी फेसबुकवर ओळख; डिनरला सांगून लॉजवर नेलं, तरुणाने केलं भयानक कृत्य

Nagpur News: नागपूरमधून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने बारावीच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलिस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे नागपूरमधून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने बारावीच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. प्रवीण लहारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूरमधील सावनेर परिसरात हा संताजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय तरुणी केळवद पोलीस ठाण्यात अंतर्गत राहते. ती सावनेरच्या कॉलेजमध्ये शिकते. सप्टेंबर २०२२ मध्ये तिची फेसबुकवर प्रवीणशी मैत्री झाली. दोघांचे नाते वाढत गेले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रवीण तिला भेटण्यासाठी केळवडला जाऊ लागला. कधी कधी दोघे नागपुरात भेटत असत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Breaking Marathi News)

पुढे दोघांनी २६ फेब्रुवारीला भेटायचं ठरवलं. ठरवल्यानुसार प्रवीणने तिला नागपूरला बोलावले. सीताबर्डी परिसरात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर महाराज बागेत गप्पा मारायचे ठरले. काही वेळ बसल्यानंतर दुपारी २ वाजता प्रवीणने तिला हॉटेलवर जेवायला जात असल्याचे सांगितले. दोघे थेट एका लॉजवर गेले. प्रवीणने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र तिने नकार दिला.

तरुणीच्या नकारानंतर आरोपी प्रवीणने तिला दोघांमधील संबंध संपवण्याची धमकी (Crime News) दिली. दरम्यान, नकार देऊनही प्रवीणने तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. प्रवीणने तिला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे तरुणी नैराश्यात गेली. तिच्या वागण्याचा संशय तिच्या आईला आला. आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, आपल्यासोबत घडलेला प्रकार तरुणीने आईजवळ कथन केला. मुलीवर बलात्कार झाल्याचं समजताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मुलीला घेऊन पोलिसांत (Police) तक्रार दिली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT