Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरात मंदिरातील दानपेटी चोरी; तीन जणांना घेतले ताब्यात

Nagpur News : नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळगाव भागातील महाकाली शीतला माता मंदिरातून चोरट्यांनी चक्क दानपेटी चोरी केल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: चोरट्यांकडून मंदिरातील दानपेट्या व देवाच्या अंगावरील दागिन्यांवर लक्ष केले जात आहे. रात्रीच्यावेळी मंदिरात प्रवेश करून चोरी केली जात आहे. अशाच प्रकारे नागपूरमधील महाकाली शीतला देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत चोरीच्या घटनेतील तीन चोरट्याना अटक करण्यात आली आहे. यात दोघे अल्पवयीन आहेत. 

नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळगाव भागातील महाकाली शीतला माता मंदिरातून चोरट्यांनी चक्क दानपेटी चोरी केल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दोन चोरटे हे दानपेटी उचलून नेताना दिसून येत आहे. मंदिरातील पुजारी व भाविक सकाळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. 

८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केल्यानंतर चोरट्याचा शोध लागला. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत चोकशी केली असता आरोपीने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी चोरट्यांकडून ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीच्या घटनेत दोन अल्पवयीन 

नागपुरातील मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्यात तीन जणांचा समावेश होता. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एका मुख्य आरोपीला अटक केली. तर दोन अल्पवयीन आरोपीना सुधारगृहात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT