Nagpur Crime News Telangana Police Arrested Naxalite Couple Both involved in 39 serious crimes
Nagpur Crime News Telangana Police Arrested Naxalite Couple Both involved in 39 serious crimes Saam TV
महाराष्ट्र

Naxalite Couple Arrested: कुख्यात नक्षलवादी दाम्पत्याला मध्यप्रदेशातून अटक; तेलंगणा पोलिसांची मोठी कारवाई

साम टिव्ही ब्युरो

Naxalite Couple Arrested News: तब्बल 39 गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याला अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. कुसनन अशोक रेड्डी उर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई उर्फ रहमती, असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांवरही 20 लाखांचे बक्षीस होते. (Latest Marathi News)

यापूर्वी 2005 मध्ये गडचिरोली येथील पुराडा परिसरात केलेल्या हिंसक गुन्ह्यात देखील कुसनन अशोक रेड्डी याला अटक झाली होती. तेलंगणातील उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कुसनन अशोक रेड्डी सुरुवातीच्या काळात एका कंपनीत कार्यरत होता. तिथे तो कामगार चळवळीशी जुळला.

1989 ला नक्षल चळवळीशी संपर्क आल्यानंतर ‘पीपल्स वॉर’मध्ये तो सक्रिय झाला. 1992 मध्ये अम्प्रो बिस्कीट कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. 1995 ला जामिनावर सुटल्यानंतर तो दंडकारण्यात गोंदिया येथे पुन्हा सक्रिय झाला.

2001 मध्ये लग्नानंतर त्याने गडचिरोली येथे कुरखेडा पुराडा परिसरात विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या. 2006 साली त्याची नक्षल्यांच्या महाराष्ट्र समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली. 2012 मध्ये त्याची जामीनावर सुटका झाली.

काही काळ गावात राहिल्यानंतर 2014 पासून तो भूमिगत होता. यादरम्यान अशोक दंडकारण्य स्पेशल झोनल समितीत सदस्य म्हणून कार्यरत होता, तर त्याची पत्नी रहमती उत्तर बस्तर समितीची सदस्य आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणातील हनमकोंडा येथून दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य मुला देवेंदर रेड्डी याला नक्षल समर्थक तिरुपतीसह अटक करण्यात आली आहे. अशोक रेड्डीच्या अटकेने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा; नार्वेकरांना पाहून उबाठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Maharashtra Lok Sabha Voting Live: लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या तयारीला लागा, शरद पवार गटाचं कार्यकर्त्यांना आवाहन

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT