Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरदिवा लावलेली आणि विना क्रमांकाची बोलेरो सायरन वाजवित बेदरकारपणे पळविणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना सिडको पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या चौकशीत ही गाडी तहसिलदाराची असल्याचे समोर आले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेवू.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिडको पोलिसांनी पेट्रोलिंगवेळी मध्यरात्री १२ वाजता एक अंबरदिवा लावलेली आणि विना क्रमांकाची बोलेरो सायरन वाजवत बेदरकारपणे फिरवणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना पकडले. पोलिसांच्या चौकशीत ती गाडी सोयगाव तहसीलदारांची (Tahsildar) असल्याची माहिती समोर आली. तहसीलदाराच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन ही स्टंटबाजी केल्याचे स्पष्ट झाले.
मोहनलाल रेशमाजी हरणे हे सोयगावचे तहसीलदार आहेत. ते मूळचे हर्सूल येथील रहिवासी आहेत. त्यांना नुकतेच शासकीय वाहन मिळाले आहे. मात्र पासिंग व कुशनची कामे बाकी असल्याने त्यांनी ती गाडी हर्सूल येथील घरी ठेवली होती.
22 ऑगस्टच्या रात्री तहसीलदार हरणे यांचा मुलगा गौरवकुमार मोहनलाल हरणे व मित्र असे तिघे विना क्रमांकाची शासकीय गाडी घेऊन बाहेर निघाले. विशेष म्हणजे, त्यांनी गाडीवर अंबरदिवा देखील लावलेला होता. अंबरदिवा असल्याने सायरन वाजवित ते बेदरकारपणे फिरु लागले. यानंतर संशय आल्याने सिडको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गाडी जप्त केली. या प्रकाराची सध्या परिसरात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.