Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : प्रियकरासाठी चोरल्या हिऱ्याच्या अंगठ्या; मोलकरणीचा कारनामा, पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात

Nagpur News : ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या दिसत नाही; असे माहित पडल्यानंतर दुसरीकडे मरिया हिने नुपूर अग्रवाल यांना पन्नास हजार मागितले होते. यानंतर ती कामावर सुद्धा आली नाही

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : घरात मोलकरीण म्हणून काम करत असताना संधीचा फायदा घेत हिऱ्याची अंगठी चोरून नेली. हि चोरलेली अंगठी सदर महिलेने तिच्या प्रियकराला भेट म्हणून दिली. दरम्यान चोरी प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत अंगठी चोरी करणाऱ्या महिलेला पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच महिलेच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतले आहे.

नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे हि घटना घडली होती. तर मरिया सूर्यराव सुक्का (वय ३०) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मारिया हि विनायक नगरातील नुपूर अग्रवाल यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. १८ मे रोजी नुपूर अग्रवाल या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर दोन हिऱ्याच्या अंगठ्या काढून ठेवल्या होत्या. मरीया हिने अंगठ्या पहिल्या असता संधीचा फायदा घेत हिऱ्याच्या दोन्ही अंगठ्या चोरून नेल्या. 

अंगठ्या चोरून मोलकरीण झाली गायब 

दरम्यान ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या दिसत नाही; असे माहित पडल्यानंतर दुसरीकडे मरिया हिने नुपूर अग्रवाल यांना पन्नास हजार मागितले होते. यानंतर ती कामावर सुद्धा आली नाही. मात्र अंगठ्या सापडून येत नसल्याने नुपूर यांना मरीया हिनेच अंगठ्या चोरल्याचा संशय आला. या संदर्भात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. जरीपटका पोलिसांनी शोध घेतला असता मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेल्याची माहिती मिळाली.

प्रियकर पैसे मागत असल्याने केली चोरी 
यानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालला पथक पाठवत मरियाला अटक केलं. त्यावेळी तिला विचारपूस केली असता तिने हिऱ्याच्या अंगठ्या तिचा प्रियकर पवन भास्कर याला दिल्याची कबुली दिली. पवन भास्कर हा मुळचा नाशिकचा असून त्याचे मरियासोबत प्रेम प्रकरण होत. पवन पैसे मागत असल्याने त्या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT