Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

भयंकर! दोन चिमुकल्यांसमोर पतीने चक्क पत्नीला संपवलं

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवनगाव फाटा परिसरात पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीने दोन लहान चिमुकल्यांसमोर पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पती पसार झाला होता. पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Nagpur latest Crime News)

अंकिता भगत असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव, तर सचिन भगत असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षापासून अंकिताचा सचिनसोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसांच्या संसारानंतर त्यांना दोन मुलं देखील झाली. मात्र त्यानंतर सचिनला दारूचे व्यसन लागले. त्यातच सचिन कुठलाही कामधंदा करत नसल्याने दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडाला लागले.

दरम्यान, सचिनकडून होणाऱ्या सतत छळामुळे तीन महिन्यांपूर्वी मृतक अंकिता ने घर सोडले आणि माहेरी राहायला आली, काही दिवस अगोदर तिने सुरक्षा रक्षकाचे काम सुरू केले. शिवणगाव फाट्यावर सुरू असलेल्या सिमेंट रोड च्या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असताना सचिन मोठ्या मुलाला घेऊन अंकिताला भेटायला आला. त्यावेळी सचिनने अंकिताला सोबत घरी चालण्यासाठी तगादा लावला. अंकिताने नकार देताच सोबत आणलेल्या चाकू ने अंकिताच्या पोटावर वार केला.

जखमी अवस्थेत अंकिता ला सोडून पळ काढला. अंकितासोबत काम करणाऱ्या कामगारांनी तिला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना त्यांची दोन्ही मुले समोर खेळत होती. चिमुकल्यांना काय झालं कळत नसल्याने रडायला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करत सचिनला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT