Accident
AccidentSaam tv

भीषण अपघात; ट्रकची दोन वाहनांना धडक, पाच जणांचा मृत्‍यू

भीषण अपघात; ट्रकची दोन वाहनांना धडक, पाच जणांचा मृत्‍यू
Published on

जळगाव : बकऱ्या घेऊन जात असलेल्‍या वाहनाला रॉंग साईडने भरधाव वेगाने येत असलेल्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात 5 जण ठार झाले; तर सहा जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी नशिराबाद टोल नाक्याजवळील उड्डाणपुलाजवळ घडली. (jalgaon news accident truck hit two vehicles five people death on the spot)

Accident
सूनेने केली सरपंच सासूची इच्छा पूर्ण; जिद्दीने झाली पोलीस उपनिरीक्षक

जळगाव (Jalgaon) आणि नशिराबाद येथून बकऱ्या भरून पीकअप गाडी (क्र. एमएच ४३, एडी १०५१) फैजपूर (Faizpur) येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ (Bhusawal) भुसावळकडून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (क्र. एमएच ०९, एचजी ९५२१) जोरदार धडक दिली.

पाच जणांचा जागीच मृत्‍यू

यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमीवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com