Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: वाद मिटविण्यासाठी मध्‍यस्‍थी करत फसवणूक; पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

वाद मिटविण्यासाठी मध्‍यस्‍थी करत फसवणूक; पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

मंगेश मोहिते

नागपूर : हॉटेल चालक आणि जमिन मालक यांच्यामध्ये मध्यस्थी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक (fraud) करणाऱ्या हरीश रंगूनवाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. मध्यस्थी करत असताना झालेल्या देवाण-घेवाणीचे पैसे घेऊन रंगूनवाला पळाला होता. मात्र पोलिसांनी (Police) त्याला बेड्या ठोकल्या. (Live Marathi News)

नागपूर शहरातील एका हॉटेल चालकाचा आणि जमीन मालकाचा वाद सुरू होता. या संदर्भात कोर्टामध्ये केस सुद्धा सुरू होती. दरम्‍यान हरीश रंगूनवाला हा त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेला. जवळपास 44 लाखांमध्ये मध्यस्थी करत तोडगा काढण्यात आला. मात्र हॉटेल चालकाने दिलेले 44 लाख घेऊन रंगूनवाला पळून गेला.

मध्‍यस्‍थी विरोधात दुसरीही तक्रार

हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून रंगूनवाला याला पकडण्यात आले. त्यातील काही रक्कम हस्तगत सुद्धा करण्यात आली. मात्र हॉटेलचा सामान हा रंगूनवाला द्यायला तयार नव्हता. यावरून पोलिसात आणखी तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी रंगूनवाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. रंगूनवाला हा शहरातील प्रतिष्ठित असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचे कारणामे बघितले तर तो फसवणूक करणारा असल्याचे समोर येताना दिसते आहे. रंगूनवाला याच्या विरोधात फसवणुकीच्या आणखी काही तक्रारी असल्याचे सुद्धा पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT