KOLKATA WOMAN ALLEGES FORCED CONVERSION ATTEMPT AT KAMTHI DARGAH, THREE ARRESTED IN NAGPUR CASE Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील दर्ग्यामध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा एका महिलेचा गंभीर आरोप आहे. कोलकात्यातील महिलेच्या तक्रारीनंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • कोलकात्यातील महिलेवर नागपुरात दर्ग्यात धर्मांतरासाठी दबाव टाकला

  • सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे

  • या प्रकरणात ३ आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू

  • महिलेने विनयभंग, मारहाण, धमकी आणि डांबून ठेवल्याचे आरोप केले

  • तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Kamathi Kolkata Women Conversion Case नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील मरियम अम्मा दर्ग्यात एका महिलेचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कोलकात्यातील महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील डमडम परिसरात राहणारी महिला एप्रिल महिन्यात मरियम अम्मा दर्ग्यातील उर्स कार्यक्रमासाठी कामठीत आली होती. मागील तीन ते चार वर्षांपासून ती दरवर्षी उर्ससाठी येथे येत होती. यावेळी काही व्यक्तींनी तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने धर्मांतरास विरोध केल्यानंतर तिचा विनयभंग करण्यात आला, मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिला १८ ते १९ एप्रिलदरम्यान डांबून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिने स्वतःची सुटका करून कोलकात्यात परत जात उपचार घेतले आणि स्थानिक डमडम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनास्थळ कन्हान पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने डमडम पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केले. झिरो एफआयआर प्राप्त होताच कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यानंतर नागपूर पोलिसांचे एक पथक कोलकात्यात जाऊन पीडित महिलेची सविस्तर चौकशी केली. या प्रकरणात ताजी तनविरुद्दीन कलीमउद्दीन (५२), ताजीन मुस्ताफिजुद्दीन तनविरुद्दीन (२४) आणि तेजस आनंद खोब्रागडे २४) यांना २९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यापैकी दोन आरोपी महिला आणि एक वयोवृद्ध व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार मारहाण, विनयभंग, धर्मांतरासाठी दबाव तसेच हत्येच्या प्रयत्नासंबंधीही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून तांत्रिक तपासासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात असून अशा प्रकारे दबाव आणून धर्मांतर करण्याचे आणखी प्रकार घडले आहेत का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT