Nagpur : भाजप नगरसेवक सहलीवर, महापालिका वाऱ्यावर Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : भाजप नगरसेवक सहलीवर, महापालिका वाऱ्यावर

महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या भाजपचे कार्यालय बंद

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवले आहे. यामुळे नागपूर महापालिकेत शुकशुकाट दिसून येत आहे. नागपूर महापालिकेत भाजपचे 156 पैकी 105 नगरसेवक आहे. सत्तापक्ष असल्याने सर्व समित्यांवर भाजप नगरसेवक आहेत. सर्व नगरसेवक सहलीला गेल्याने या कॅबिनमध्ये शुकशुकाट आहे.

हे देखील पहा-

एरवी या कॅबिन मध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल आणि काम घेऊन येणाऱ्यांची वर्दळ असते. मात्र, महापालिकेत नगरसेवक सहलीवर आणि महापालिका वाऱ्यावर असे चित्र बघायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. कॉंग्रेसकडून साडेतीन दशक भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी उमेदवारी दाखल करून रंगत निर्माण केली आहे.

डॉ. भोयर यांच्या उमेदवारीमुळे भाजपने सावध भूमिका घेतली आहे. काल, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. या सर्व नगरसेवक, नगरसेविकांना एका एका गटामध्ये विभागण्यात आले आहे. उत्तम सुविधा करता यावी याकरिता १५ ते २० नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. विधानसभानिहाय गट तयार करण्यात आले आहेत.

भाजपने जोखीम न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सर्वच नगरसेवकांना २७ नोव्हेंबरला सहलीला रवाना करण्यात येणार आहे. हे नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहेत. नगरसेवकांच्या अनुपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रति नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी आता मिळणार आहे. पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांची नागरिकांच्या समस्या सोडविण्याची रंगीत तालीम होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT