भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
ATM मधून पैसे निघत नसल्याचे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. मात्र नागपूरमध्ये तुम्हाला धक्का बसेल अशी घटना घडलीय.नागपूरच्या खापरखेडात ATM मधून एक हजार रूपये काढण्यासाठी कार्ड टाकले तर थेट 1600 रुपये मिळाल्याची घटना घडली. ही बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लोकांची अॅक्सिस बँकेच्या ATM बाहेर पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली. नेमकं काय घडत होतं खापरखेडातील ATM मध्ये? त्याची माहितीच सकाळ वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने दिलीय.
या ATM मधील ही पहिलीच घटना नाही तर याआधीही 1 हजार रुपये काढल्यास 2 हजार रुपये मिळत असल्याचा प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय...तर ही घटना तांत्रिक चुकीने झाल्याचं बँकेकडून सांगण्यात आलंय.नागपूरमधील खापरखेडातच नाही तर यापुर्वीही AXIS बँकेच्या ATM मध्ये असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय.
मिळाली माहितीनुसार, खापरखेडा येथील बाजार चौकातील हे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये पैसे टाकताना तांत्रिक चूक झाली, असल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र ही चूक खातेधारकांना मालामाल बनवून गेली. खापरखेडा शहराच्या मध्यभागी असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएमध्ये गावात पैसे काढण्यासाठी धांदल उडाली. विशेष म्हणजे हा प्रकार पहिल्यांदा नाही, तर यापूर्वी सुद्धा एकदा घडला आहे. एटीएममध्ये बुधवारी संध्याकाळपासून तांत्रिक बिघाड आला. जो तो आपल्या जवळच्या लोकांना ही बातमी देत विड्रॉल करायला लावत होता.
19 जून 2018 रोजी नाशिकमधील AXIS बँकेच्या ATM मध्ये 5 पट पैसे निघण्याचा प्रकार
22 जून 2022 ला याच ATM मधून दुप्पट पैसे निघत असल्याची घटना
नेहमी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यावरून बँकेविरोधात तक्रारी असतात. मात्र
एटीएममधून अचानक ग्राहकांना जास्त पैसे मिळाल्यामुळे ग्राहक अँक्सिस बँकेवर नक्कीच खूष असणार
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.