Nagpur Accident 
महाराष्ट्र

Nagpur Accident : लग्नसमारंभ आटोपून येताना ट्रकने दुचाकीला चिरडलं, काकू-पुतण्याचा मृत्यू, ४ वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला

Nagpur accident news : नागपूरच्या गोंडीबोरी फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने काकू आणि पुतण्याचा मृत्यू झाला. मात्र ४ वर्षांचा चिमुकला सार्थक थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Nagpur Accident News : लग्नसमारंभ आटोपून घरी परत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून घराकडे निघालेल्या कुटुंबाला ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचवालाय. नागपूरमधील कुही तालुक्यातील गोंडीबोरी फाटा येथे हा दुर्दैवी अपघात झाला.

काकू, पुतण्या आणि ४ वर्षांचा चिमुकला लग्न आटोपून दुचाकीवरून घराकडे येत होते. गोंडीबोरी फाट्यावर आले असता भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या अपघातात काकू आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षाचा सार्थक थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. किशोर मेश्राम आणि गुणाबाई मेश्राम यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ४ वर्षाचा सार्थक जखमी झालाय.

किशोर मेश्राम हा काकू गुणाबाई आणि ४ वर्षांचा सार्थक याच्यासोबत लग्नासाठी गेला होता. लग्न आटोपल्यानंतर दुचाकीवर तिघे घरी येत होते. त्याचवेळी गोंडीबोरी फाट्यावर एका ट्रकने जोराद धडक दिली. या अपघातात किशोर आणि गुणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणून चार वर्षांचा सार्थक थोडक्यात बचावला.

किशोर मेश्राम हा आपली काकू गुणाबाई मेश्राम व सार्थकसोबत दुचाकीवर घराकडे येत होते. त्याचवेळी गोंडीबोरी फाट्यावळ समोरच्या वाहनाने जागीच ब्रेक मारल्याने किशोरचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. किशोरची गाडी बाजूला येणाऱ्या ट्रकच्या समोर आली अन् जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात गुणाबाई व किशोर जागीच मृत्यू झाला. तर सार्थक जखमी झाला. जखमी सार्थक याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

पंतप्रधान मोदींनी केले जगातील सर्वात उंच श्री राम पुतळ्याचे अनावरण, जाणून घ्या या ७७ फूट उंचीच्या पुतळ्याची खास वैशिष्ट्ये

India GDP: भारताची अर्थव्यवस्था बुलेट स्पीडनं सुस्साट; GDPनं गाठला मोठा टप्पा, 'या' क्षेत्रात जबरदस्त कामगिरी

SCROLL FOR NEXT