Nagpur Road Accident: नागपुरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सने रिक्षाला चिरडले, सैन्यातील २ जवानांचा मृत्यू; ६ जखमी
Nagpur Kamathi Road Accident Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Road Accident: नागपुरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सने रिक्षाला चिरडले, सैन्यातील २ जवानांचा मृत्यू; ६ जखमी

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १७ जून २०२४

नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुर- कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या भयंकर अपघातात लष्करातील दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आणखी ६ जण गंभीर जखमी झालेत. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी रिक्षामधून सैन्याचे जवान कामठी येथील सैन्याचा डेपो(कॅन्टोन्मेंट) येथे जात होते. या दुर्घटनेत एका जवानाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने ऑटो रिक्षा फेकली गेली. यातच चिरडून या जवानांचा अपघात झाला तर आणखी सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या अपघातावेळी बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर बस चालक अपघातस्थळावरुन फरार झाला. यानंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या तसेच महामार्गावर रास्ता रोको ही करण्यात आला. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मध्ये सलग दुसऱ्यी दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक.

Mansi Naik: रिक्षावालीच्या नादाला लागायच नाय!

Maharashtra Politics: 'प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा', ठाकरेंच्या खासदाराचे काँग्रेस हायकमांडला पत्र; मविआमध्ये नवा वाद?

IND vs SA : अंतिम सामन्यात भारत की दक्षिण अफ्रिका जिंकणार? फायनलआधीच बड्या माजी खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी

Maharashtra News Live Updates : पुणे अपघात: अल्पवयीन मुलासह टँकर मालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT