Nagpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident News : दुचाकीस्वारास वाचविण्यात कार अनियंत्रित; थेट घुसली गॅरेजमध्ये, एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Nagpur News : नागपूरमधील रामटेक- तुमसर महामार्गावर गोंदिया येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या अधिकाऱ्याची कार गोदिया वरुन रामटेकच्या दिशेने निघाली होती

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: रामटेक- तुमसर महामार्गावरील राखी तलाव चौकात भीषण अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून या अपघातात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून गॅरेजमध्ये असलेले चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना शनिवारी घडली आहे.

नागपूरमधील (Nagpur) रामटेक- तुमसर महामार्गावर गोंदिया येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या अधिकाऱ्याची कार गोदिया वरुन रामटेकच्या दिशेने निघाली होती. सदरची कार रामटेक बायपास येथील राखी तलाव चौकात आली असता मोटरसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारवरील (Accident) नियंत्रण सुटले. यानंतर कारने चौकालगत असलेल्या भेलपुरीच्या ठेल्याला धडक देत पुढे कार मोटारसायकल रिपेरिंग गॅरेजला जाऊन आदळली.


या अपघातात भेलपुरी ठेल्याजवळ उभे असलेले लखन शेखर भोसले (वय ३५) यांना जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गॅरेजमध्ये मोटार सायकलची रिपेंरिग करीत असलेले देवलापार स्टेशनचे पोलिस शिपाई रविद्र उदाराम मेश्राम (वय ४४), प्रगती अनिकेत चौके (वय २७), धनंजय मनोहर होळकर (वय ४८),  विशाल कवडू कोडापे (वय २७) हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT