Nagpur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Accident News: नोकरीच्या शोधात निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Accident News in Nagpur: तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हे उपचार अपयशी ठरले आणि त्याची प्राण ज्योत मालवली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News: नागपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाखतीसाठी निखालेल्या तीन व्यक्तींवर काळाने घाला घातला आहे. दुचाकीवरुन जात असताना कारची जोरदार धडक बसल्याने या तिघांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Nagpur News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर-अमरावती मार्गावरील कोंढाळी येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुषमा वाघाडे, प्रतीक्षा वाघाडे आणि रोशन शहारे या तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटना घडली तेव्हा दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र रोशन यात बचावला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हे उपचार अपयशी ठरले आणि त्याची प्राण ज्योत मालवली.

मुलाखतीसाठी जाताना काळाची झडप

सुषमा वाघाडे, प्रतीक्षा वाघाडे आणि रोशन शहारे हे तिघेही एका खाजगी कंपनीत मुलाखतीसाठी जात होते. यावेळी प्रवासासाठी त्यांनी दुचाकी निवडली. एकाच दुचाकीवरून हे तिघेही प्रवास करत होते. नोकरीच्या शोधात घरातून निघालेले हे तिघेही आनंदाची बातमी घेऊन येतील याकडे कुटुंबीयांचे डोळे लागले होते.

मात्र नियतीच्या मनात काही भलतंच होतं. तिघेही घरी आले मात्र आनंदाची नाही तर दु:खाची बातमी घेऊन. एकाच गावातील तिघांचा अपघाती मृत्यु झाल्याने चमेली गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT