Nagapur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: भरधाव कार नियंत्रण सुटून उलटली, दुभाजकाला धडकली; भीषण अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

Nagpur Accident: नागपूरवरून अमरावतीकडे भरधाव कार नियंत्रण सुटूट पलटी होत दुभाजला धडकली असून या भीषण अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजणक आहे.

Sandeep Gawade

Nagpur Accident

नागपूरवरून अमरावतीकडे भरधाव कार नियंत्रण सुटूट पलटी होत दुभाजला धडकली असून या भीषण अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजणक आहे. वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात हा अपघात घडला असून कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

रजनी गिरणाळे आणि त्यांचा मुलगा अक्षय गिरणाळे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. श्रद्धा गीरणाळे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार नागपूरवरून अमरावतीकडे जात होती. दरम्यान कारचा वेग प्रचंड असल्यामुळे वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात कार पलटी झाली आणि दुभाजकाला धडकली. कारमध्ये रजनी गिरणाळे आणि त्यांचा मुलगा अक्षय गिरणाळे आणि मुलगी श्रद्धा गीरणाळे होते. कारची धडक इतकी भीषण होती की अक्षरश: चुराडा झाला. यात रजनी गिरणाळे आणि त्यांचा मुलगा अक्षय गिरणाळे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून श्रद्धा गीरणाळे बचावली आहे मात्र ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजणक आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांना कारमधून बाहेर काढले. जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT