नागपुर (Nagpur) शहरात शुक्रवारी तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. (Latest Accident News)
तीन रस्ते अपघात
नागपूर येथे तीन रस्ते अपघात झाले आहेत. पहिला रस्ता अपघात कामगर नगर येथे झाला, त्यात एका विवाहितेचा मृत्यू झाला. दुसरा रस्ता अपघात (Nagpur Road Accident) विहीरगाव येथे झाला, त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा अपघात पारडी परिसरात झाला, त्यात एका मुलीचा मृत्यू झाला.
पहिला अपघात
शुक्रवारी ४३ वर्षीय देवानंद उके हे त्यांच्या ३९ वर्षीय पत्नी सोनी उके यांच्यासोबत नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी कामनगरला पोहोचले होते. येथून ते रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. त्यानंतर वाटेत कामनगर भागापासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक (Nagpur Accident) दिली. यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात
शुक्रवारी रात्री उशिरा ३४ वर्षीय राहुल संतोष राऊत आणि ४२ वर्षीय लक्ष्मण दादाजी धिंगरे हे दोघे मिनी ट्रकमधून जात होते. त्यानंतर विहिरगाव परिसरात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या मिनी ट्रकला जोरदार धडक (Road Accident) दिली. त्यामुळे मिनी ट्रकची दुरवस्था झाली. मिनी ट्रकमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात
२० वर्षीय आकांक्षा पाटील ही मोटरसायकलवरून कुठेतरी जात (Nagpur Accident) होती. त्यानंतर पारडी परिसरात मोटारसायकल चालवणाऱ्या आकांक्षाचा तोल गेला आणि आकांक्षा दुचाकीवरून पडली. तिने स्वत:वर नियंत्रण ठेवण्यापूर्वीच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मिनी ट्रकने तिला चिरडले. या घटनेत आकांक्षाचा मृत्यू झाला. या तिन्ही प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
या तिनही अपघातात ट्रकने धडक दिल्याचं समोर आलंय. ही वाहनं भरधाव वेगात असल्याची देखील माहिती (Road Accident) मिळतेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.