वर्धा - जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बाभूळगाव येथे टायर फुटल्याने मिनी मालवाहू ट्रक नदीत कोसळल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी तर सात जण किरकोळ जखमी झाले आहे. या जखमींना सेवाग्राम रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मिनी मालवाहू ट्रक मध्ये 13 जण सवार होते. ते वाकी येथील दर्ग्यावर स्वयंपाकाचा कार्यक्रम आटपून परत येत असताना सेलू तालुक्यांतील सुरगाव जवळील बाभुळगाव कोंगा येथील वाघाडा नदी वरुन जात असताना मिनी ट्रकचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाला.
हे देखील पहा -
गावकऱ्यांना आरडा-ओरडचा आवाज ऐकू येताच गावकरी नदी कडे धावले आणि त्वरित नदीत उडी घेत नदीत पडल्याना बाहेर काढले. नदीवरील पुलाला कठडे नसल्याने अपघात घडत असल्याची माहिती नागरिकांची दिली. अपघाताची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी असून सात जण किरकोळ जखमी झाले आहे.
यात 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. दोन गंभीर असलेल्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता पोलिसांनी पाठविले आहे. अपघात सर्व जखमी हे देवळी तालुक्यातील पिंपळगाव या गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.