MOLESTATION AT NAGPUR OBC GIRLS HOSTEL – SECURITY BREACH AT MIDNIGHT AI
महाराष्ट्र

धक्कादायक! ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये २ जण घुसले, विद्यार्थीनीचा विनयभंग केला अन्

Nagpur government hostel molestation case : नागपूरमधील सरकारी ओबीसी मुलींच्या वसतीगृहात रात्री घुसून एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. दोन्ही आरोपी पसार झाले असून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

  • दोन आरोपींनी खोलीत घुसून मुलीचा विनयभंग केला

  • हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही नसल्याचा धक्कादायक खुलासा

  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू, मुलींमध्ये भीतीचं वातावरण

  • ६४ मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; नागपूर प्रशासनावर टीका

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Crime Latest News : राज्याची उपराजधानी नागपूरमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात शिरुन विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरात सरकारी वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. आरोपी दाराची कुंडी काढून आत शिरले अन् तरूणीवर अत्याचार केला. सरकारी वस्तीगृहात सीसीटीव्ही नाहीत, त्याशिवाय पुरेसी सुरक्षाही नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यापरकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

नागपूरमधील सरकारी मुलींच्या हॉस्टेलमध्ये आरोपी घुसले. ते कडी काढून एका मुलीच्या खोली शिरले अन् विनयभंग केला. त्यानतर मुलीचा मोबाईल घेऊन पसार झाले. २२ तारखेला रात्री तीन वाजता ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सरकारी हॉस्टेलमध्ये ६४ तरूणी राहातात.

तरूणीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण अद्याप आरोपीला बेड्या ठोकण्यात अपयश आले आहे. हॉस्टेलमध्ये घुसून तरूणीचा विनयभंग झाल्यामुळे इतर तरूणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याशिवाय नागपूरमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध कधी लावणार? हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही कधी लावले जाणार? हॉस्टेलमधील ६४ मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT