nagar parishad nagar panchayat election Live Update News Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांचा आरोप

nagar parishad nagar panchayat election Live Update News : राज्यात आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान होणार आहे. सर्व अपडेट एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

येवल्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने बजावला मतदानाचा हक्क

अवघ्या काही तासांत विवाहसोहळा असतानाही लोकशाहीचा मान राखत नाशिकच्या येवला शहरातील नवरीने आज मतदानाचा हक्क बजावला. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित होत या नवरीने आदर्श नागरिकत्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले.

Maharashtra Nagar Parishad Live :  माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व पत्नी दुर्गा तांबे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड शहरातील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मोठा गोंधळ

बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील बूथ क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 15 मधील ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा गोंधळ ईव्हीएम मध्ये एरर आल्याने बंद पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली जवळपास सकाळपासून दोन ते तीन मशीन बदलले आहेत वारंवार प्रॉब्लेम होत आहे मतदाना आम्हाला व्यवस्थित करता येत नाही लाईट गेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडत आहेत अशी तक्रार मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी बोलताना व्यक्त केली आहे.

मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत ईव्हीएम बंद, मतदान प्रक्रियेला अडथळा

वाशिम च्या मालेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असताना नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 मधील ईव्हीएम मशीन सकाळी 8 वाजताच्या दरम्यान अचानक बंद पडली. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना थांबण्याची वेळ आली आहे. मतदान केंद्रावर पर्याय व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Maharashtra Nagar Parishad Live : भंडाऱ्यात कुडकुडत्या थंडीतही मतदानाला उत्साहात प्रारंभ

भंडारा शहरासह तुमसर साकोली आणि पवनी नगरपालिका निवडणूक होत आहे या चार नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेला आहे एकंदरीतच सकाळपासून थंडी असली तरी मतदार मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता प्रारंभ झालेला आहे एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप नेते परीणय फुके, शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : मतदानाच्या पार्श्वभूमीवर आष्ट्यात भानामतीचा प्रकार ! रस्त्यावर ठिकठिकाणी भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार

सांगलीच्या आष्टा नगरपरिषदेची निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टा शहरामध्ये भानामतीचा प्रकार समोर आला आहे.शहरात भंडारा आणि लिंबू ठिकठिकाणी टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्त्यावर भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एका उमेदवाराकडूनच हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आष्टा शहरामध्ये सुरू आहे,मात्र मतदानापूर्वी अशा पद्धतीने करण्यात आलेल्या घटनेमुळे आष्टा शहरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप, माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप

एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला असून शिंदेचा पैशाच्या बॅगा आणतानाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहनही वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे

https://www.facebook.com/share/v/17ksAuqusA/

लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क; पुलगावच्या नवरदेवाची चर्चा | Pulgaon Groom Votes

पुलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत एका नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 'बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवानं मतदान केलंय,' . या अनोख्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.

परभणीत जिल्ह्यातील 7 नगरपालिका निवडुकीसाठी आज मतदान

परभणी जिल्ह्यातील जिंतूर,सेलू मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, आणि पूर्णा या 7 नगरपालिकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे जिल्ह्यातील 7 नगरपालिकासाठी 2लाख 49 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर 7 नगराध्यक्ष पदासाठी 31 उमेदवार आणि 165 नगरसेवक पदासाठी 500 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत सकाळी 7 वाजल्यापासून मतदानााला सर्वात झाली आहे कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त केंद्रावर तैनात केला आहे.

nagar parishad nagar panchayat election Live Update News :  संभाजीनगरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड नगर परिषदेसाठी नगरपरिषद मतदान केंद्रावरील खोली क्रमांक दोन मधील मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदानाला विलंब होत आहे.

Maharashtra Nagar Parishad Live : रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका विवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या दहा जागांसाठी 34 आणि नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 575 उमेदवार रिंगणात आहेत. 2 लाख 37 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच केंद्रांवर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालीय. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी हे मतदान होतंय. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळीच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतय. मतदान शांततेत पार पाडाव यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि कडून आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वाडी नगरपरिषद येथील आदर्श नगर येथील मतदान केंद्रावर मॉक पोलदरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडली होती त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मशीन दुरुस्त करून मतदान सुरळीत सुरू झाले

बुलढाण्यात पैसे वाटप करताना रंगेहात पकडले, भरारी पथकाची कारवाई

खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 महेबुब नगर मधे मतदारांना पैसे वाटताना 50 हजाराची रोकड जप्त.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

पैसे वाटप करणारे संबंधित तीन व्यक्ती फरार

रोख रक्कम सोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलाणी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त.

DHULE धुळे जिल्ह्यात मतदानाला सुरुवात

धुळे जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील 2 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत, नगरसेवक पदाच्या 67 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

1 लाख 8 हजार 816 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यासाठी 129 मतदान केंद्र सज्ज्य करण्यात आले आहे.

Pune Voting : जवळपास आठ वर्षानंतर आळंदीकरांनी बजावला मतदानाचा हक्क

आळंदी नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्या पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. जवळपास आठ वर्षानंतर आळंदीकरांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आळंदीतील मतदारांमध्ये मोठ्या उत्साहाच वतावरण आहे. अगदी सकाळी साडे सात वाजेपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या 21 नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे.

Beed : बीड शहरातील पेठ बीड भागात रात्रीतून पैसे वाटप करत असल्याचा दोन तरुणांवर आरोप

नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रात्रीतून दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असलेल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातील पेठ बीड भागातील सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. स्कुटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Dharashiv Nagar Parishad Live :  धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात

धारशिव जिल्ह्यातील शहरी भागातील मतदारांना आपल्या हक्काचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडीचा योग ४ वर्षांनंतर आला आहे.जिल्ह्यातील ८ नगरपालिकांत २८७ केंद्रात २ लाख ४३,६६७ मतदार मतदान करतील. नगराध्यक्ष व १८३ नगरसेवक निवडण्याची आज संधी असणार आहे. निवडणूक विभागाने यासाठी जय्यत तयारी केली असून, यासाठी १४३५ कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आमदार तानाजी सावंत,माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यासह अनेक दिवसाच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.सकाळी साडेसात वाजता मतदान केंद्रावर मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली

Maharashtra Nagar Parishad Live : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

नगरपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केलेला पाहिला आपल्याला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड श्रीगोंदा आणि शेवगाव या तीन ठिकाणी नगरपालिकांसाठी निवडणूक होत असून तिन्ही ठिकाणी निवडणुकीत चांगलेच चुरस निर्माण झाली आहे जामखेड येथून मतदान केंद्र बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी

Jalana Nagar Parishad Live :  जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान

जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतुर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान मतदान होत आहे. तिन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष आणि 65 नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटी मध्ये बंद होणार आहे.जालन्यातील अंबड, भोकरदन आणि परतूरला 3 नगराध्यक्ष 65 नगरसेवकांसाठी आज मतदान पार पडत आहे.नगराध्यक्ष पदासाठी 18 तर नगरसेवकांसाठी 237 उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू होता या प्रचारानंतर आज या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

धुळे नगर परिषद व नगरपंचायत मतदान

धुळे नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे

जिल्ह्यातील 2 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीसाठी 10 उमेदवार रिंगणात

नगरसेवक पदाच्या 67 जागांसाठी 207 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत

1 लाख 8 हजार 816 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार

129 मतदान केंद्र सज्ज्य

Maharashtra Nagar Parishad Live :

पुणे जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायतीचे मतदान होत असताना मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्या मतदान केंद्रावर तात्काळ पर्याय ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पद्धत तयार करण्यात आलेला आहे यासाठी आठ कर्मचाऱ्यांची टीम ईव्हीएम मशीन घेऊन तैनात करण्यात आलेली आहे.

Pune Nagar Parishad Live : तळेगावमध्ये फक्त ४ प्रभागात मतदान

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसाठी आज निवडणूक पार पडते आहे. यातील एक म्हणजे पुणे जिल्ह्यातलं तळेगाव दाभाडे नगरपरिषद. एकूण 27 प्रभागातील होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच 19 जणांची बिनविरोध निवड झाल्यामुळे उर्वरित पाच जागांवर निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्यामुळे आज तळेगाव दाभाडे येथील चार प्रभागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील बाल विकास महाविद्यालयात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान

आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यात आज १२ नगरपरिषदा 3 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.. सासवड नगरपरिषदेच्या २२ नगरसेवक तर १ नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान होत आहे.मतदान ७ वाजता सुरू होईल.त्या अगोदर मतदान केंद्रावर तयारी करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन मतदान करून घेण्यासाठी सज्ज आहे.यावेळी सासवडमध्ये.महायुती मधील दोन नेत्यांमध्ये लढत होत आहे.पुरंदरचे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे विरोधात पूर्वी काँग्रेस मध्ये असलेले आणि आता भाजपात गेलेले माजी संजय जगताप यांच्यात लढत आहे.काही महिन्यांपूर्वी संजय जगतात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे यावेळेस या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.या अगोदर ही सत्ता काँग्रेसकडे म्हणजे संजय जगताप यांच्याकडे होते.यावेळी हे दोन्ही नेते महायुती असले तरी स्थानिक निवडणुकीत समोरासमोर आहेत...

पुण्यात 524 मतदान केंद्रे, आज मतदान

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायत, अध्यक्षपदाकरिता 76 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 955 उमेदवार यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायती मिळून एकूण 524 मतदान केंद्रे असतील.

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाली. जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी पिंक मतदान केंद्रे, जिथे मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी या महिला आहे. सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, आदी अधिकारी, कर्मचारी तैनात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: या राशींसाठी आजचा दिवस सोन्याची संधी; कामात गती आणि धनलाभ होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: कराडजवळ सहलीच्या बसला अपघात, ८ विद्यार्थी जखमी

Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी लखपती होणार, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Jalgao Travel : जळगावला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण पाहायला विसरू नका, जवळच आहे प्रसिद्ध अभयारण्य

SCROLL FOR NEXT