Satara : साताऱ्यातील नगर पंचायतींचे निकाल स्पष्ट; सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच, गृहराज्यमत्र्यांना धक्का Saam TV
महाराष्ट्र

Satara : साताऱ्यातील नगर पंचायतींचे निकाल स्पष्ट; सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच तर गृहराज्यमत्र्यांना धक्का

सातारा जिल्ह्यातील सर्व सहा नगर पंचायतीचे निकालांचे चित्र स्पष्ट झाले असून निकालांमध्ये पाटण मध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना जोरदार धक्का बसला आहे. तर पाटणमध्ये राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व सहा नगर पंचायतीचे निकालांचे चित्र स्पष्ट झाले असून निकालांमध्ये पाटण मध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना जोरदार धक्का बसला आहे. तर पाटणमध्ये राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली आहे. तसेच कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) धूळ चारत शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. (Maharashtra Nagar Panchayat Election Results)

या स सर्व निवडणुकांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत

लोणंद - नगरपंचायत निकाल

लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादीची (NCP) निर्विवाद सत्ता

राष्ट्रवादी - १०

कॉंग्रेस - ३

भाजप - ३

शिवसेना - ०

अपक्ष - १

प्रभाग ११ मधील एका जागेवरील चिठ्ठीचा निकालात राष्ट्रवादीचे भरत बोङरे विजयी.

वडूज नगरपंचायत निकाल :

भाजपा-6,

राष्ट्रवादी काँग्रेस -5, 

 काँग्रेस -1 ,

अपक्ष -4 ,

वंचित आघाडी -1.

एकूण =17

खंडाळा नगर पंचायत-

एकूण-17 जगां पैकी

राष्ट्रवादी काँग्रेस 10 

भाजप 7 

आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ची सत्ता

कोरेगाव नगरपंचायत :

कोरेगाव मध्ये राष्ट्रवादी ला मोठा धक्का राष्ट्रवादी चे नेते शशिकांत शिंदे याना धक्का बसला आहे. सर्व १७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून १३ जागा कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलला आणि चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला, नगरपंचायतीत सत्तांतर तर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता आली आहे.

दहिवडी नगर पंचायत

राष्ट्रवादी = ८

भाजप = ५

शिवसेना = ३

अपक्ष = १

पाटण नगर पंचायत

भाजप – 0

शिवसेना –2

राष्ट्रवादी –15

काँग्रेस –0

इतर –0

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

SCROLL FOR NEXT