ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डाळीत जास्त प्रमाणात प्रथिने असतात आणि अनेक घरांत ती बनवून खाल्ली जाते. प्रत्येक डाळ ही आरोग्यासाठी चांगली मानली जाते.
डाळीत बऱ्याचदा कीटकांचा प्रादुर्भाव होतो. मग डाळीला स्वच्छ करणे अवघड जाते. जाणून घ्या कसे स्वच्छ ठेवावे.
एक कापड किंवा चादर घेवून त्यावर डाळ उन्हात पसरवा. उष्णतेमुळे कीटक निघून जाण्यास मदत होते.
तुम्ही डाळीच्या डब्यात कडूलिंबाची पाने ठेवू शकता. पानांचा कडवटपणा कीटकांना दूर ठेवणयास मदत करतो.
प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणाऱ्या तमालपत्राच्या वासामुळे डाळीतील कीटकही दूर होतील.
लसणाच्या काही पाकळ्या सोलून त्या एका डब्यात ठेवा. यामुळे कीटक देखील दर राहतील.
कोणतीही डाळ साठवताना ती एका हवाबंद डब्यात ठेवा, अधूनमधून डाळ ढवळत राहा.