NCP leader Dhananjay Munde celebrates with supporters after Urmila Kendre’s victory in Parbhani Municipal Council elections. saam tv
महाराष्ट्र

Parbhani Nagarpalika Result: धनंजय मुंडेंच्या भावुक सभेनं जिंकलं, मुंडेंच्या बहिणीचा दणदणीत विजय, भाजपला धक्का

Parbhani Municipal Council Results 2025: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे. काही ठिकाणी मतमोजणीचे कौल समोर येऊ लागले आहेत. यातील अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत. बहुतेक ठिकाणी भाजपला झटका लागलाय.

Bharat Jadhav

  • परभणी नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दणदणीत विजय.

  • उर्मिला केंद्रे नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

  • धनंजय मुंडेंच्या भावनिक सभेचा निकालावर मोठा प्रभाव पडला.

परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांचे सुरुवातीचे निकालात हाती आलेत. सुरुवातीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने आघाडी घेतली होती. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला केंद्रे या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे उर्मिला केंद्रे यांचे बंधू आहेत. उर्मिला केंद्रे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सभा घेतली होती. या सभेत भावूक होत त्यांनी मतदारांना आव्हान केलं होतं. त्याच सभेचा मोठा फायदा उर्मिला केंद्रे यांना झाला. येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री मुंडे या निवडून येतील असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र राष्ट्रवादीनं येथे बाजी मारलीय.

परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या. आज त्यांची मतमोजणी सुरु आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा या नगरपालिकांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच परभणीच्या सोनपेठ, मानवत आणि गंगाखेड या तीनही नगरपालिकांतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर होते. उर्मिला केंद्रे यांचा देखील समावेश होता. आता त्यांनी विजय मिळवलाय.

तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या मतदारसंघातील सेलू नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे, तर जिंतूरमध्ये राष्ट्रवादीसोबत काट्याची टक्कर असून सध्या भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पुढे आहे. परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप अशी तिहेरी लढत होती. दरम्यान सुरुवातीला भाजपच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री मुंडे या विजयी होतील असं म्हटलं जात होतं. तर सत्तादेखील भाजपकडे राहत १३ नगरसेवक विजयी होतील असा अंदाज होता. परंतु राष्ट्रवादीनं भाजपला गंगाखेडमध्ये मात दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

Maharashtra Nagar Palika Election Result Live: अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांचा सुवर्ण विजय

Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

SCROLL FOR NEXT