Lizards News Saam TV
महाराष्ट्र

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Rare Lizards Fond in Nagpur : पाल ग्रे कलरची असून तिच्या पाठीवर बॉक्स बॉक्ससारखे आकार आहेत. हे बॉक्स देखील काळ्या आणि चॉकलेटी रंगाचे आहेत. नागपूरच्या पीपल फाटा आउटर या परिसरात ही पाल सकाळी आढळून आली होती.

Ruchika Jadhav

घरामध्ये अडचणीच्या ठिकाणी किंवा लाइट्स आणि किटक असलेल्या उजेडात पाल पाहायला मिळते. आजवर तुम्ही विविध प्रकारच्या पाली पाहिल्या असतील. काळ्या, पांढऱ्या अशा विचित्र पाली पाहताच अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. अशात नागपूरमध्ये एक दुर्मिळ प्रजातीची पाल पाहायला मिळाली आहे.

दुर्मिळ पाल अगदी एखाद्या सापासारखी दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की पाल आकाराने अन्य पालींपेक्षा थोडी मोठी आहे. तसेच ही पाल ग्रे कलरची असून तिच्या पाठीवर बॉक्स बॉक्ससारखे आकार आहेत. हे बॉक्स देखील काळ्या आणि चॉकलेटी रंगाचे आहेत. नागपूरच्या पीपल फाटा आउटर या परिसरात ही पाल सकाळी आढळून आली होती.

काल सकाळी वाईल्डलाइफ सोसायटीच्या सदस्यांना फोनवर याबाबत माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच गौरांग वाईकर आणि नीतीश भांदक्कर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पालीला पकडले असून ही दुर्मीळ जातीची पाल असल्याचं म्हटलं आहे.

ही पाल दुर्मीळ असून तिचं नाव गिरी गेकोयेला असं आहे. ही पाल साल २०१६ मध्ये आढळली होती. त्याआधी सापासारखी पाल आढली होती तेव्हा कोलेगल गेको असं या पालिचं नाव होतं.

ही दुर्मिळ पाल मिळणे ही चांगली गोष्ट आहे परंतु या प्रजातीचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या प्रजातीचा देखील निसर्ग चक्रात महत्त्वाचा वाटा आहे, असं संस्थापक पॉज आणि वन्यजीव अभ्यासक निलेश भणगे यांनी म्हटलं आहे.

सापासारखी पाल विषारी आहे का?

ही दुर्मिळ पाल सापासारखी दिसते. त्यामुळे अनेक व्यक्ती तिला पाहून घाबरतात. आपला जीव जाऊनये यासाठी अशा पालींचा जीव घेतात. खरंतर सापासारखी दिसणारी ही पाल अजिबात विषारी नाही. अशा पालींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT