Lizard Home Remedies : भिंतीवरील पालींपासून सुटका मिळवायची आहे ? 'हे' घरगुती उपाय करुन पाहा !

Pal Ghalvnyache Upay : आपण पाल दिसली का तीला हकलतो पण ती परत थोड्यावेळाने त्याच भिंतीवरती वावरताना दिसतात.
Lizard Home Remedies
Lizard Home RemediesSaam TV

Bhintivaril Pal Kashi Palval : पाल प्रत्येकांच्या घरात दिसत असते. पाल ही विषारी असते त्यामुळे घरातील भिंतीवर पालीचा वावर नसलेलाच बरा. आपण पाल दिसली का तीला हकलतो पण ती परत थोड्यावेळाने त्याच भिंतीवरती वावरताना दिसतात.

आपलं घर स्वच्छ आणि निरोगी (Clean & Healthy) राहावं यासाठी आपण वेळोवेळी साफसफाई (Cleaning) करत असतो. मच्छर,मुंग्या, किडे, जीवजंतू घरामध्ये वाढू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल (Pest Control) करतो.

Lizard Home Remedies
Home Hacks : तुमच्या बाथरुमची टाइल्स चमकेल आरशासारखी, 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

अनेक लोकांना पाल बघून घाम फुटतो पालीचे भीती वाटते. त्यामुळे या काही घरगुती उपाय करून तुम्ही पाली पासून कायमची सुटका मिळवू शकता. जाणून घेऊया त्यासाठी काही घरगुती उपाय.

1.कांदा आणि लसूण

घरात ज्या ठिकाणी पाल दिसत असेल तिथे कांदा आणि लसूण लटकवून ठेवा.थेट पंख्याखाली कांदा आणि लसूण ठेवल्याने त्याचा वास घरभर पसरतो त्यामुळे भिंतीवरील पाल किंवा एखाद्या कोपऱ्यात असलेली पाल कांदा आणि लसूणच्या वासाने पळून जाते.

2. अंड्यावरील पांढरे कवच

पालीला अंड्याचा (Eggs) वास आवडत नाही त्यामुळे हा उपाय करून तुम्ही पालीपासून सुटका करू शकता.त्यासाठी अंडायावरील पांढरे टारफल किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवून हा उपाय करू शकता. याचा वास पालीपर्यंत पोहोचल्याने पाली पळून जातात.

3. काळीमिरी स्प्रे

हा स्प्रे तुम्हाला बाजारातही (Market) मिळेल आणि तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. घरी काळीमिरी स्प्रे तयार करण्यासाठी प्रथम काळीमिरी ठेचून घ्या एका स्प्रेचा बॉटलमध्ये पाणी (Water) आणि ही ठेचलेली काळीमिरी मध्ये टाकून भिंतीवर शिंपडा किंवा ज्या ठिकाणी पालीचा वावर होत असेल त्या ठिकाणी तुम्ही हे स्प्रे करून पालीला पळवू शकता.

Lizard Home Remedies
Lizard Home RemediesCanva

4. थंड पाणी

पालींना थंड ठिकाण आवडत नाही उबदार ठिकाण आवडते त्यामुळे भिंतीवर पाल दिसल्यावर थंड पाणी शिंपडा किंवा घरातील एसी चे तापमान कमी करून तुम्ही पाली पासून सुटका मिळवू शकता.

Lizard Home Remedies
Home Remedies For Long Nails : तुमच्या देखील हातांच्या बोटांची नखे वाढत नाही? फक्त हे करा, आठवड्याभरात रिजल्ट मिळेल !

या काही टिप्स तुमच्या कामी येते

  • सरडे किंवा पाल घरात न येण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळी लावा करून त्यांना घरात (Home) येण्यासाठी मार्ग उरणार नाही.

  • पाली दूर करण्यासाठी लेमनग्रास सुद्धा उपयोगी असते त्यामुळे त्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी लेमनग्रास ठेवा.

  • पाली घरामध्ये अन्न शोधत येतात.त्यामुळे किचनमध्ये खरकटे भांडी ठेवू नका. किचन अस्वच्छ ठेवू नका.

  • घरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या कारण ज्या ठिकाणी पाणी गळत आहे त्या ठिकाणी पाली अंडे घालतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com