Home Hacks : तुमच्या बाथरुमची टाइल्स चमकेल आरशासारखी, 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

Bathroom Cleaning Tips : बाथरूमच्या टाइल्स वर पाण्याचे डाग, साबणांचा खुणा दिसतात.
Home Hacks
Home HacksSaam Tv
Published On

How to Clean Dirty Bathroom Tiles : बाथरूमचा वापर रोज केल्यामुळे घाण होते म्हणून ते स्वच्छ करणे गरजेचे असते अर्थात ते तुम्ही रोज करताच. बाथरूमच्या टाइल्स वर पाण्याचे डाग, साबणांचा खुणा दिसतात.

हलक्या रंगाच्या टाइल्स वर तर हे डाग अधिक उठून दिसतात. जर त्यावर साचलेले घाण लगेच काढले नाही तर,नंतर ते काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे त्या टाइल्स वरची घाण निघते. चला तर मग आज येथे जाणून घेऊ काही उपाय, ज्यामुळे घरातील टाइल्स सहज आरशासारखी चमकेल.

Home Hacks
Kitchen Cleaning : किचनची साफसफाई करायची आहे ? 'या' टिप्स फॉलो करा, मिनिटांत होईल काम!

1. लिंबाचा रस

लिंबामध्ये अनेक गुणधर्म असतात,त्यातील एक म्हणजे डाग दूर करण्यासाठी यातील गुणधर्माचा वापर करता येईल. बाथरूमच्या फरश्या आणि भिंती स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लिंबू कापून डाग दिसत असलेल्या ठिकाणी घासून घ्या. नंतर एका स्पंज वर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस शिंपडून त्याने चोळायला सुरुवात करा. त्यामुळे टाइल्स वरचे घाण सहज निघून जाईल.

2. व्हिनेगर

बाथरूमच्या टाइल्स वर बॅक्टेरिया विकसित होण्यापासून थांबवण्यासाठी व्हिनेगर एक चांगला पर्याय आहे. यासाठी एका स्प्रेच्या बाटलीत व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. घाण झालेल्या टाईल्सवर या मिश्रणाने फवारणी करा आणि काही वेळ तसेच राहू द्या.त्यानंतर फरशी घासून पाण्याने (Water) धुवून घ्या.

Home Hacks
Leather Cleaning Tips : लेदरच्या वस्तू घाण झालेले आहे ? असे साफ करा

3. बेंकिग सोडा

बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ (Clean) करण्यासाठी एका स्वच्छ स्पंज वर बेंकिग सोडा टाकून डाग असलेल्या ठिकाणी घासून थोड्या वेळानी (Time) स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.टाइल्स आरशा सारखी चमकेल.

How to Clean Dirty Bathroom Tiles
How to Clean Dirty Bathroom Tilescanva

4. खाण्याचे मीठ

खाण्याचे मीठ वापरून तुम्ही टाइल्सवर साचलेली घाण सहज साफ करू शकता.त्यासाठी टाइल्स वरील घाण झालेला भागावर मीठ शिंपडून घासून घ्या आणि रात्र भर तसेच ठेवा. सकाळी पाण्याने टाइल्स धुवून स्वच्छ करा.

5. हायड्रोजन पेरीऑक्साइड

हे खूप मजबूत असल्यामुळे याचा वापर तेव्हाच करायला हवा जेव्हा सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतील.हायड्रोजन पेरीऑक्साइड हा परिपूर्ण सफेद करणारा एजंट आहे त्यामुळे याचा वापर करण्यासाठी प्रथम मैदा आणि हायड्रोजन पेरीऑक्साइड समान प्रमाणत घेऊन एकजीव करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही तयार पेस्ट जिथे डाग आहेत लावून सेलोफेनने झाकून ठेवा. सकाळी स्क्रब करून टाइल्स पाण्याने धुवून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com