Leather Cleaning Tips : लेदरच्या वस्तू घाण झालेले आहे ? असे साफ करा

जितक्या चांगल्या या वस्तू दिसतात तितकेची त्यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे तरच हे दीर्घकाळ आपल्याजवळ टिकतील.
Leather Cleaning Tips
Leather Cleaning TipsSaam Tv

Leather Cleaning Tips : लेदरपासून बनलेल्या अनेक गोष्टी सर्वांना वापरायला आवडतात. जॅकेट,बुट,बॅग,बेल्ट या लेदरच्या गोष्टीचा वापर बरेच लोकं करतात.

या वस्तू लोकांना आकर्षित करतात,जितक्या चांगल्या या वस्तू दिसतात तितकेची त्यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे तरच हे दीर्घकाळ आपल्याजवळ टिकतील.

चला तर मग जाणून घेऊया लेदर च्या वस्तू साफ करण्याच्या काही पद्धती त्याचा उपयोग करून तुम्ही या वस्तूंची योग्य ती काळजी (Care) घेऊ शकाल.

Leather Cleaning Tips
Kitchen Hacks : जळलेला तवा चकचकीत करण्यासाठी 'या' घरगुती हॅक्सचा वापर करा

1. सूर्यप्रकाशापासून संरक्षण

लेदरच्या वस्तू खूप वेळ सूर्यप्रकाशात ठेवल्याने त्यांच्यावर वाईट परिणाम होऊन ते लगेच कोमजून जातात.ते थेट सूर्याच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते.

2. डस्टबॅगचा वापर

लेदर साफ (Clean) करण्यासाठी जर तुम्हाला कपडा वापरायचा नसेल तर तुम्ही डस्टबॅग चा उपयोग करून तुमची बॅग साफ करू शकता. बॅग वर साचलेली धूळ डस्टबॅगळे लगेच साफ होण्यास मदत होते.

Leather Cleaning Tips
Leather Cleaning TipsCanva

3. जॅकेट फोल्ड नका करू

लेदरच्या जॅकेटची घडी करून कपाटात ठेवू नका त्यामुळे त्यावर सुरकुत्या येतात.जॅकेटला हँगरवर टाकून व्यवस्थित ठेवावे आणि जर जास्त कुरकुरीत दिसत असेल तर त्याची प्रेस करणे टाळावे.

4. लेदर बॅग धुवू नका

लेदर हे खूप नाजूक आहे. त्यामुळे ते धुणे योग्य नाही. त्याऐवजी त्यावर डाग पडल्यावर स्वच्छ करा.

5. याप्रकारे चामड्याच्या पिशव्या आणि शूज स्वच्छ करा

पिशवी किंवा शूजमधील घाण साफ करण्यासाठी कठोर ब्रिस्टल्ड ब्रश वापरा. लेदर पुसण्यासाठी आणि ग्रीस काढून टाकण्यासाठी स्वच्छ आणि कोरडे कापड घ्या. आता एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी (Water) आणि डिटर्जंट मिक्स करा आणि डागावर शिंपडा आणि हलक्या हाताने कापडाने स्वच्छ करा. लेदर क्रिस्टल क्लिअर होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com