Shraddha Thik
घर स्वच्छ नीटनेटकं दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. घरात किटक, पालींचा वावर वाढला की घर अस्वछ होते आणि आजार पसरण्याचाही धोका असतो.
घरात किटक येऊ नयेत यासाठी लादी पुसण्याच्या पाण्यात फिलाईन आणि कडुलिंबाची पानं घाला. परंतू पालींसाठी काय करावे हे कळत नाही.
पाली पळवण्यासाठी तुम्ही केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता सोपे उपाय करू शकता.
पालींना पळवण्यासाठी नेफ्थलीनच्या गोळ्या प्रभावी ठरतात. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. फक्त या गोळ्या घरात ज्या ठिकाणी पाली फिरतात तिथे ठेवून द्या. याचा वास पालींना अजिबात आवडत नाही. यामुळे पाली दूर पळतात.
कॉफीचा वास पालींना अजिबात आवडत नाही. तुम्ही कॉफीमध्ये तंबाखू पावडर मिसळून ज्या ठिकाणी पाली जास्त येतात त्या ठिकाणी ठेवू शकता. कॉफी आणि तंबाखूच्या सुंगधामुळे पाली दूर होण्यास मदत होते.
अंड्याची सालीने पालींना एलर्जी होते. अशावेळी तुम्ही अंड्याच्या सुकलेल्या साली तोडून घराच्या अशा ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणी पाली जास्त येतात. अंड्याच्या सालीच्या वासाने पाली दूर पळतील.
घराचे दरवाजे आणि खिडक्या या ठिकाणी लसणाच्या कळ्या लटकून ठेवा. लसूण आणि कांद्याचा रस काढून त्यात पाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि घरात शिंपडा. या उपायाने घरात एकही पाल येणार नाही.