Pune Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News In Nagpur: रोड रोमियोच्या Propose ला नकार; रागाच्या भरात थेट तिचं घर गाठलं अन्... पुढे जे घडलं ते भयानकच

त्याने रोडरोमीओ प्रमाणे तरुणीचा पाठलाग करत तिला प्रपोज केलं. त्यामुळे ही तरुणी खूप संतापली.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur : नागपुरमधून रोड रोमियोविषयी एक बातमी समोर आली आहे. मैत्रिणीने प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणाने हिसंक होत मुलीचे घर गाठून तमाशा केला आहे. या तरुणाने मुलीला आपल्या मनातली प्रेमाची भावना सांगितली, मात्र मुलीने त्याला नकार दिला. याचा तरुणाला खूप राग आला. त्यामुळे त्याने थेट तरुणीचे घर गाठून तमाशा करण्यास सुरुवात केली. (Marathi News)

तरुणीला दिली जीवे मारण्याची धमकी

या तरुणाने नकार मिळाल्याने मोठा कहर केला आहे. त्याने थेट तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर तरुण गेल्या काही दिवसांपासून त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या मैत्रिणीच्या प्रेमात होता. आपल्या मनातली ही भावना त्याला मैत्रिणीला सांगायची होती. जेव्हा त्याने मैत्रिणीला (Friend) ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांची सांगण्याची पद्धत चुकली. त्याने रोडरोमीओ प्रमाणे तरुणीचा पाठलाग करत तिला प्रपोज केलं. त्यामुळे ही तरुणी खूप संतापली.

जागेवरच त्याला नकार देत ती घरी निघून आली. वर्गात ही गोष्ट पसरली आणि मुलाला सर्व जण चिढवू लागले. त्यामुळे डोक्यात राग घेत त्याने मुलीचे घर गाठले. इथे आल्यावर त्याने भलताच धिंगाणा घातला. तरुणाने मुलीच्या घराबाहेर उभे राहत तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही पुढे तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर घटनेमुळे तरुणी प्रचंड घाबरली आहे. नागपूरच्या राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे.

या तरुणाला इतका राग आला होता की, त्याने रागाच्या भरात तरुणीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र तरुणीच्या आईने वेळीच पोलिसांना (Police) फोन करुन ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT