Winter Lip Care : थंडीत ओठ फाटलंय? किचनमधील २ पदार्थ देतील मऊ, गुलाबी ओठ; महागड्या लिप बामचीही गरज नाही

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडण्यासोबतच ओठ फुटणे, ओठांना भेगा पडणे आणि त्यांची त्वचा निघणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो.

winter | pinterest

मधाचा वापर

मधामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. ओठांवर थोडासा शुद्ध मध लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. काही मिनिटे लावल्यानंतर ओठ स्वच्छ धुवा. मधामुळे ओठ मऊ राहण्यास मदत मिळते.

Use of honey | pinterest

खोबरेल तेल

खोबरेल तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. ओठांवर थोडेसे खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणा कमी होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर खोबरेल तेलाचा हलका थर लावू शकता.

Coconut oil | pinterest

ओठ वारंवार चाटू नका

अनेकांना ओठ कोरडे पडले की ते वारंवार चाटण्याची सवय असते. मात्र लाळेमुळे ओठांचा कोरडेपणा आणखी वाढू शकतो. त्यामुळे ही सवय टाळा.

Do not lick your lips frequently | pinterest

पुरेसे पाणी प्या

हिवाळ्यात तहान कमी लागली तरी शरीराला पाण्याची गरज असते. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते.

Drink enough water | pinterest

ओठांची त्वचा ओढू नका

ओठांवरची कोरडी त्वचा हाताने किंवा दातांनी काढू नका. यामुळे ओठांना जखम होऊ शकते आणि रक्तही येऊ शकते.

Do not pull the skin of the lips | pinterest

खूप गरम पाणी टाळा

चेहरा धुताना किंवा अंघोळ करताना खूप गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Avoid very hot water | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : थंडीत फक्त १ चमचा मध करेल चमत्कार, ५ फायदे वाचून आजपासूनच खाऊ लागाल

Honey Benefits | AI PHOTO
येथे क्लिक करा...