Beed Crime News : भाजप नेत्याची दादागिरी; महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण, घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

उद्धट वागणूक असल्याने व ग्राहकांना सतत त्रास देत असल्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam TV
Published On

Beed News : बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरामध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बीड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साठे चौक येथील डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उद्धट वागणूक असल्याने व ग्राहकांना सतत त्रास देत असल्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. (Bank Of Maharashtra)

या मारहाणी संदर्भात नवनाथ शिराळे यांना विचारले असता बँक मॅनेजर कुठल्याच ग्राहकाशी व्यवस्थित बोलत नाही. इंग्रजीमधून अर्ज लिहायला सांगतात. तसेच उद्धट उत्तर देतात,यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Beed Crime News
Old Woman Viral Video: आजीचा नादखुळा स्टंट! फटाक्यांची पेटती माळ घेऊन आजी उतरली रस्त्यावर; पुढे काय झालं? पाहा VIDEO

डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद गंगाराम येवले हे शासकीय कामकाज करत असतांना नवनाथ शिराळे यांनी बँकेत येऊन त्यांच्या खात्याचा खाते उतारा मागितला. यावेळी डेप्युटी मॅनेजरने त्यांना ई-मेल आयडी मागितला. तो आयडी शिराळे यांनी मराठीमध्ये दिला, मात्र इंग्रजीमध्ये ई-मेल आयडी द्या. मराठीत चालत नाही, असे येवले यांनी सांगितले.

त्याचा राग आल्याने शिराळे यांनी डेप्युटी मॅनेजर येवले यांना शिवीगाळ करायला सुरवात केली. त्याचवेळी त्यांच्या सोबतचे तिघेजण पाठीमागुन आले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार डेप्युटी मॅनेजर येवले यांनी दिली आहे. त्यावरून नवनाथ शिराळे, कृष्णा नवनाथ शिराळे यांच्यासह इतर 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध बीड (Beed) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
Chai Tapri Viral Video : किळसवाण कृत्य! चहावाल्याने लघवीच्या कपात ओतला चहा; ग्राहकाने चहा पिताच...पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com