Crime News SaamTV
महाराष्ट्र

Raigad News: नदी किनारी दुर्गंधी पसरली, ग्रामस्थांनी सुटकेस उघडला, महिलेचा कोंबलेला मृतदेह पाहून..

Womans body found in suitcase: एका सुटकेसमध्ये कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या महिला अत्याचारांवरील घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका सुटकेसमध्ये कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेणमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पेणमध्ये एक अज्ञात सुटकेस सापडला. त्या सुटकेसमध्ये एका महिलेचं मृतदेह आढळला आहे. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दुरशेत गावाच्या हद्दीत बाळगंगा नदी किनारी हा सुटकेस सापडला.

परिसरात दुर्गंधी पसरल्यानं ग्रामस्थांनी तपासणी केली. तेव्हा अज्ञात सुटकेस आढळला. अज्ञात सुटकेस उघडून पाहिल्यानंतर ग्रामस्थांना धक्काच बसला. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानं ग्रामस्थांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस थेट गावात दाखल झाले. या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

सुटकेसमधील महिलेचे वय ३०-४० असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, ५-७ दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT