MVA leaders stage a symbolic protest on horseback and bullock carts in Pune and Thane against the fuel usage appeal. saam tv
महाराष्ट्र

PM मोदींच्या आवाहनानंतर महाविकासआघाडीचे अनोखे आंदोलन; थेट घोड्यावरून काढली सवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल-डिझेल वापर कमी करण्याच्या आवाहनानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाविरोधात शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ अनोखे आंदोलन केले. विशेष म्हणजे, वसंत मोरे यांनी घोड्यावर बसून आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आंदोलनाला पाठिंबा दिला.घोड्यावरून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा रंगली असून नागरिकांचेही याकडे लक्ष वेधले गेले. आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तसेच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची खास बाब म्हणजे आमदार आव्हाड स्वतः घोड्यावर बसून मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान “मोदी म्हणतात पेट्रोल-डिझेल कमी वापरा, आम्ही म्हणतो सत्ताधाऱ्यांनी TMT बसचा वापर करा” अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले. यामधून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चा ठाणे महापालिकेत पोहोचल्यानंतर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी स्वतः TMT बसने प्रवास करावा, अशी मागणी करण्यात आली. पाचपाखाडीहून निघालेल्या या अनोख्या मोर्चाची सांगता ठाणे महानगरपालिका मुख्यालयात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

Sangli Breaking : वादळी वाऱ्यामुळं भिंत कोसळली, देवीच्या कार्यक्रमाला आलेल्या ६ भाविकांचा दबून मृत्यू

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?

Panvel Picnic Spot : 'पनवेल'जवळ आहेत ५ हिल स्टेशन्स; कडक उन्हात मिळेल काश्मीरचा फिल, फॅमिलीसोबत एकदा जाच

SCROLL FOR NEXT