Ambadas Danve’s surprise nomination sparks tensions within the MVA alliance as Congress questions lack of consultation. saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! महाविकासआघाडी फुटली? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Mva Rift Over Mlc Candidature Ambadas Danve: विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय... ठाकरेसेनेनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरेंऐवजी थेट अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा विधानपरिषदेसाठी केल्यानं मविआत नाराजी नाट्य रंगलयं... विधानपरिषदेवरून मविआत नेमकं काय घडलं?

Suprim Maskar

विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती... शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनं ही जागा स्वतः उद्धव ठाकरेंनी लढवावी, असा आग्रह धरला होता...यासाठी मातोश्रीवर कॉंग्रेसच्या फेऱ्याही झाल्या होत्या. मात्र अर्ज भरण्याची अंतिम तारीख एका दिवसावर आली असताना आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाकडून थेट अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं. अर्थातच त्यांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या......

मात्र हे नाव जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली . दानवेंच्या नावाची कुठलीच चर्चा असताना थेट उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विधानपरिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले...

ठाकरे नव्हे दानवे उमेदवार, मविआत फूट?

विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी विधानपरिषदेवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसमध्येही अनेक नेत्यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत होती... त्यात ठाकरेसेनेनं अंबादास दानवेंची घोषणा केल्यानं मविआतील समन्वयाचा अभाव उघड झालाय...

दुसरीकडे राष्ट्रवादीने महाविकास आघाडी एकत्र बसून यावर निर्णय़ घेईल, असं विधान केलयं..

मात्र, काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे संकेत दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार की दानवेच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत उभी फूट पडणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT