Sharad Pawar News in Marathi
Sharad Pawar News in Marathi  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News : साहेबांसाठी काय पण! शरद पवार मुलीच्या लग्नाला येणार म्हणून कार्यकर्त्याने दिला परंपरेला छेद

भारत नागणे

Sharad Pawar News : आपल्या नेत्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका मुस्लिम समाजातील कार्यकर्त्याने समाजातील पारंपारिक रुढी आणि परंपरांना छेद दिला आहे. महाराष्ट्रात मुस्लिम समाजात पहिल्यांदाच त्यांनी शनिवारी आपल्या मुलीच्या लग्नाचा बार उडवून दिला आहे. सामाजिक बदलाच्या या घटनेने बरोबरच ऐंशीव्या वर्षी देखील शरद पवार आणि कार्यकर्ता यांच्यातील नाळ किती घट्ट आहे हे अधोरेखित झाले आहे. (Latest Marathi News)

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील लतिफ तांबोळी या राष्ट्रवादी कार्यक्रत्याची मुलगी हिना हिचा आज विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला शरद पवार (Sharad Pawar) यांनी सपत्नीक हजेरी लावली.

मुस्लिम समाजात शुक्रवार हा शुभ दिवस मानलो जातो. या दिवशी विवाह,मुंज असे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु तांबोळी यांनी आपल्या नेत्यासाठी मुस्लिम समाजातील रूढी परंपरांना छेद देत पहिल्यांदाच सामाजिक बदल स्वीकारला आहे. त्यांनी चक्क त्यांच्या मुलीचे शनिवारी लग्न‌ केले.

एवढेच नाही तर शरद पवार यांच्या सोयीसाठी लग्नाची तारीख आणि मुहूर्ताची वेळ देखील त्यांनी बदलली. मुस्लिम (Muslim) समाजात सकाळी ११ वाजताचा मुहूर्त पवित्र मानला जातो. तरीही तांबोळी यांनी दुपारी तीनच्या मुहूर्ताची निवड केली.

आज दुपारी शरद पवार सपत्नीक लग्न‌सोहयासाठी हजर झाले. तेव्हा तांबोळी यांना आनंदा अश्रू अनावर झाले. माझा देव आला म्हणून त्यांनी त्यांनी शरद पवार व प्रतिभा पवार यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 day Work week: आठवड्यातून ४ दिवस काम, कामाची गुणवत्ता वाढेल का? ८१ टक्के लोकांना जे वाटतं ते तुम्हालाही वाटतंय का?

Navneet Rana: '१५ सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल समजणार नाही...' नवनीत राणांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

Video: ट्रकचा U-Turn एकाच कुटुंबातील 6 जणांसाठी काळ ठरला! थरारक अपघाताचं CCTV समोर

Married Life Tips: पार्टनर सोबत सतत भांडण होतंय? या चुका टाळा, नात्यात येईल गोडवा

Cleaning Stains Tips: कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे डाग तसेच राहतात? तर फक्त 'या' गोष्टी वापरून पहा

SCROLL FOR NEXT