Bilkis Bano Case , Beed, Muslim Morcha saam tv
महाराष्ट्र

Bilkis Bano Case : बिल्कीस बानोंवरील अन्याय दूर करा; हजाराे मुस्लिम महिला उतरल्या रस्त्यावर

संविधान बचाव संदर्भात या प्रमुख मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

विनोद जिरे

Beed Muslim Community Morcha : बिल्कीस बानो यांच्यावर अन्याय करणा-यांना अटक करा. मौलाना कलिम सिद्दीकी यांची सुटका करा अशा मागण्या करत बीड येथे मुस्लिम महिलांनी माेर्चा (morcha) काढला. आजचा मुस्लिम महिलांचा माेर्चा हा ऐतिहासिक निषेध मोर्चा म्हणावा लागेल.

हा माेर्चा बीड शहरातील किल्ला मैदान येथून सुुरु झाला. कारंजा रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. त्या ठिकाणीं पाच विद्यार्थिनींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी हा देश गंगा जमना तहजीबने चालतो हा देश सर्व धर्मांचा आहे एक धर्माचा नाही. देश म्हणून एकत्र येऊ या बेरोजगारी कमी करू या. तसेच बिल्कीस बानो प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आशी मागणी यावेळी केली.

दरम्यान या माेर्चात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चांमध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणात संशयित आरोपींना मोकाट सोडण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. मुस्लिम धर्मगुरु वरील वारंवार होणाऱ्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध केला. संविधान बचाव संदर्भात या प्रमुख मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT