नगरमध्ये 30 वर्षीय महिलेची वार आणि गळा आवळत निर्घृण हत्या Saam Tv
महाराष्ट्र

नगरमध्ये 30 वर्षीय महिलेची वार आणि गळा आवळत निर्घृण हत्या

३० वर्षीय महिलेचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर : ३० वर्षीय महिलेचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. डोक्यात हत्याराने वार करुन, अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डोक्यात हत्याराने वार करुन, अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आल्याचा आरोप आहे.

हे देखील पहा-

महिलेची ओळख पटू नये, म्हणून चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा पूर्णतः विद्रूप करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेगाव या ठिकाणी एका शेतातील जमिनीच्या बांधावर महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना कळवली आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी लवकरच धाव घेतली आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक तसेच डॉग स्कॉडला पाचारण करत वरिष्ठांना कल्पना देत पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक दुधाळ करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

SCROLL FOR NEXT