Uddhav Thackeray
Uddhav Thackeray SaamTV
महाराष्ट्र

"पोलिस ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेलेत"

भारत नागणे

पंढरपूर : राज्यात खून, बलात्कार (Murder, rape) आणि मुलींच्या अपहरणाच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघाल्याचे आपण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पोलिसांचा धाक राहिला नसून पोलिस हे ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले असल्याची टीका भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ Chitra Wagh यांनी आज पंढरपुरात केली.

हे देखील पहा -

चित्रा वाघ पंढरपूर येथील अत्याचारग्रस्त मुलीच्या पिडीत कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. पिडीत कुटुंबाची भेट घेतेल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर MVA Goverment हल्लाबोल केला. दिवसा ढवळ्या महिला आणि मुलींवर लैगिंक अत्याचार होत आहेत. अशा वाढत्या घटनांमुळे राज्यातील लेकी बाळींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक शहरामध्ये व गावांमध्ये खून, अपहरण आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांमधील आरोपी मोकाट फिरत आहेत. निर्ढावलेल्या गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

कायदा सुव्यवस्था कधीही इतकी बिघडली नव्हती ती आता बिघडली आहे. पोलिस Police ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेले आहेत. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे देखील उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

SCROLL FOR NEXT