Murbad Crime Saam tv
महाराष्ट्र

Murbad Crime : घरात घुसत शस्त्राचा धाक दाखवून दागिने लुटले; दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Murbad News : घरात ५ ते ६ दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला. यानंतर घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दखवत दीड तोळे सोने आणि सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले आहेत

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
मुरबाड
: मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले धसई परिसरात बुधवारी रात्री एका घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून घरातून दीड तोळे सोने व २० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी टोकावडे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

मुरबाड तालुक्यातील धसई गावातील म्हसा रोडलगत बुधवारी रात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला आहे. यामुळे भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान धसई येथे राहणाऱ्या जगदीश गोल्हे यांच्या घरात ५ ते ६ दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला. यानंतर घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दखवत दीड तोळे सोने आणि सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले आहेत. 

दरोडेखोरांनी घरात घुसून घरातील सदस्यांना चॉपरचा धाक दाखवून धमकावून लूटमार केली. या धाडसी कृत्यामुळे गोल्हे कुटुंबीय पुर्णपणे हादरून गेले आहेत. लूटमार केल्यानंतर दरोडेखोर पसार झाल्यावर गोल्हे कुटुंबीयानी आरडाओरड केली. आवाज एकूण आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जमा झाले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दरम्यान घरात प्रवेश करताना दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरट्यांनी याच परिसरातील एका बंगल्यातही कंपाउंडवरून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तेथे प्रवेश करण्यात ते अपयशी ठरले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सशस्त्र दरोड्यामुळे धसई परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची आणि परिसरात टेहळणी वाढवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील गणेशोत्सव २४ तास खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार? VIDEO

Shanaya Kapoor: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा शनाया कपूरच्या स्टायलिंग टिप्स

Phodniche Varan Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा खमंग फोडणीचे वरण, जिभेवर चव रेंगाळत राहील

UPI Loan : आता UPI द्वारे मिनिटांत मिळणार लोन! ही आहे संपूर्ण प्रोसेस

Teddy Name History : 'टेडी' हे नाव कसं पडलं? अस्वलाशी आहे संबंध

SCROLL FOR NEXT