Akola Saam Tv
महाराष्ट्र

महापालिका विरोधी पक्षनेत्याच्या अर्वाच्च भाषेचा व्हिडिओ व्हायरल; प्रभाग रचनेचा घेतला होता आक्षेप

अकोला महापालिका निवडणुकीचे राजकारण निवडणूक पूर्वीच तापायला लागले असून विरोधी पक्षनेत्याचा एका व्हायरल व्हिडिओ मुळे सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - महापालिकेने जाहीर केलेली प्रभाग रचना ही सत्ताधारी भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर झाल्याचा आक्षेप नोंदवत प्रशासनाच्या दोन कर्मचाऱ्यांना दालनात तीन तास बसवून ठेवणाऱ्या काँग्रेसचे (Congress) गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी केलेल्या अर्वाच्च भाषेतील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला. या व्हिडिओ मूळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओ मध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून या व्हिडिओमुळे काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत. अकोला महापालिका प्रशासनाने १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर केली.

हे देखील पहा -

महापालिका प्रशासनाने सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर प्रभाग रचना करून जाणीवपूर्वक मुस्लीम व दलित वस्त्यांमध्ये मतांचे विभाजन करण्याचे काम केल्याचा आरोप करीत काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी 1 फेबवारी रोजी सायंकाळी जाणीवपूर्वक मुस्लीम व दलित वस्त्यांमध्ये मतांचे विभाजन करण्याचे काम केल्याचा आरोप करीत काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी 1 फेबवारी रोजी सायंकाळी सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांना दालनात तीन तास बसवून ठेवले.

प्रगणक गट समजावून सांगण्याची मागणी करतेवेळी साजीद खान यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला. यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान काल दिवसभर मनपा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit Photos: 'रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा' माधुरी दिक्षीतचे फोटो पाहून प्रेमात पडाल

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या १२२ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे काय आरक्षण?

Maharashtra Live News Update : मुंबईतील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Maharashtra Cabinet: राज्य सरकारचे ५ मोठे निर्णय; 5 व्या वित्त आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय, वाचा संपूर्ण शासन निर्णय

Tulsi: वारंवार तुळशीचे रोप सुकून जाते का? काय आहे धोक्याचा इशारा?

SCROLL FOR NEXT