Political activity intensifies as parties prepare candidate lists ahead of Maharashtra municipal elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

Municipal Elections in Maharashtra: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. नेतेमंडळी तिकिटासाठी पक्षांकडे आपली वशिलाबाजी करत आहेत. घराणेशाहीच्या राजकारणाचे आरोप समोर येत आहेत, नेते पत्नी, मुले आणि नातेवाईकांसाठी तिकिटांसाठी लॉबिंग करत आहेत. निष्पक्ष उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

  • महापालिका निवडणुकांची घोषणा होताच पक्षांतर्गत हालचाली वाढल्या.

  • भाजप-शिवसेना महायुतीतून निवडणूक लढवण्याचं निश्चित.

  • हजारो इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील.

महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षांनी मोर्चबांधणीलाा सुरुवात केलीय. ज्या-त्या पक्षाने आपआपल्या नेत्यांना कामला लागण्याच्या सुचना दिल्यात. दुसरीकडे इच्छुकांनी तिकीटासाठी आपलं वजन वापरत वशिलाबाजी सुरू केलीय. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार आहेत. उमेदवारीसाठी नेते मंडळी आपआपल्या पक्षाकडे फिल्डिंग लावत आहते.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून दोन्ही मिळून जवळपास दोन हजार इच्छुक उमेदवार आहेत. हे इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. पण त्यात त्यांना तिकीट मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटू लागली आहे. कारण त्यांच्या पक्षातले खासदार आमदार मंत्री यांनाच त्यांच्या घरी दोनदोन तिकीट हवी आहेत.

काही जणांना आपल्या मुलासाठी काही जणांना मुलगी आणि पत्नीसाठी तर काहीजणांना आपल्या बहिणीसाठी उमेदवारी तिकीट हवंय. त्यासाठी आपल्या पक्षाकडे आता आपलं वजन वापरायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. आता त्या वजनाचा किती परिणाम पक्ष श्रेष्ठीवर होतो ते पहावे लागेल पण शिवसेना आणि भाजप मधील इच्छुक नातेवाईकांची संख्या ही जास्त आहे.

सुरुवातीला पाहूयात शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या घरी कोणाला किती?

दोन दिवसांपूर्वीच माजी आणि आजी आमदारांमध्ये तिकीट मागण्यावरून रुसवारुसवी दिसली. आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल हे पक्षामध्ये सक्रिय आहेत. शिवाय निवडणुकीसाठी जी समिती नेमली त्या समितीचे सदस्य आहेत. पण त्यांच्या जागी म्हणजे गुलमंडी प्रभागात माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे पुत्र चंद्रकांत किंवा भाऊ राजू तनवाणी यांना तिकीट मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि तशी त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे.

फायर ब्रँड नेते आणि पालकमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते संजय शिरसाट यांनीही दोन तिकिटाची मागणी केली आहे. त्यांचा मुलगा सिद्धांत यापूर्वी नगरसेवक होते. त्यांनाही यावेळेस तिकीट द्यावं आणि मुलगी हर्षदा यांनाही तिकीट द्यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे.

चार माजी महापौरांना हवीत घरात दोन दोन तिकिटं हवीत.

त्यापाठोपाठ माजी महापौर यांनी नंदकुमार घोडेले यांनी आपल्या पत्नीसाठी आणि स्वतःसाठी दोन तिकीट द्यावं अशी मागणी केली आहे.

माजी महापौर विकास जैन यांनीही त्यांना आणि त्याच्या पत्नीला तिकीट द्यावा अशी मागणी केलेली आहे.

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांना आणि त्यांच्या पुतण्याला तिकीट द्यावं अशी मागणी केली तर माजी महापौर गजानन बारवाल यांनीही त्यांना आणि त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारीची मागणी केलेली आहे. हे सगळे प्रमुख नेते मानले जातात. आता दोन तिकिटाची मागणी केल्यानंतर एक मिळाला तरी पत्नी किंवा आपण स्वतः निवडणुकीत उभे राहू शकतो असा त्यांचा बहुतेक विचार असावा म्हणून पक्षाकडे एकाच वेळेस दोन तिकिटाची मागणी केली गेली.

आता याच नेत्यांनी आपल्या घरात किमान एक तरी टिकीट मिळावं आणि मिळाले तर दोन मिळवावं असा प्रयत्न सुरू केल्याचे सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली, पक्षात काम करणाऱ्या व्यक्तीकडून तिकीट मागितलं जातं पक्षपातळीवरून त्यांचं काम किंवा लोकांमध्ये असल्या त्यांचा वावर यावरून त्यांना तिकीट मिळेल असे ते सांगितले.

शिवसेनेत ह्या प्रमुख नेत्या सोबतच आणखी काही नेते आहेत त्यांनाही असंच तिकीट पाहिजे. मग ९०० पेक्षा अधिक इच्छुक असलेल्या इच्छुकांची अवस्था काय? भाजपमध्येही नेत्यांकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या उघडपणे कोणीही यावर बोलत नसले तरी खासदार आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा मुलगा हर्श्र्वर्धन सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी सुरू केली. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना तिकीट मिळावं यासाठी डॉक्टर कराड यांचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.

खासदारानंतर आमदार संजय केनेकर यांनी आपला मुलगा आणि जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या यादीत नाव दिले आहे. भाजपच्या यादीत ही स्थानिक पातळीवरच्या काही नेत्यांची नातेवाईक मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त करतात. पण सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू असल्यामुळे लॉबिंगसाठी थोडी वाट पाहावं असं चित्र दिसत आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या निवडणुकीच्या तयारीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे आता प्रमुख नेत्यांनीच आपल्या घरात तिकीट मिळावं यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाची चर्चा तर होणारच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं त्यांचं स्वप्न, पण...; राज ठाकरेंचा निशाणा कुणाकडं?

Dhirde Recipe : कपभर गव्हाच्या पिठाचे बनवा पौष्टिक धिरडे, लगेच रेसिपी लिहून घ्या

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे ते दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोण कोण झळकणार? भाऊच्या धक्क्यासाठी रितेश देशमुख सज्ज

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२६ मध्ये खरंच पगार वाढणार का? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT