नारंगी गावाच्या शेजारी ही कंपनी असून आगीमुळे कच्च्या मालाचे ड्रम फुटून मोठ्या प्रमाणात स्फोट होत आहेत.
१९ जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ रस्ता राहणार वाहतुकीसाठी बंद
पुण्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी दोन्ही रस्ते राहणार बंद
धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी चलो मुंबईचा नारा दिला होता 21 जानेवारी रोजी ते आझाद मैदानावरती आमरण उपोषण करणार होते या अगोदरच जालना पोलिसांनी दीपक बोराडे यांना ताब्यात घेतल्या असून पोलिसांच्या निषेधार्थ बीडच्या गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावरती धनगर समाज बांधवांकडून टायर जाळून पोलिसांचा तीव्र निषेध करण्यात आला.
बीडच्या परळी तालुक्यातील मिरवट या ठिकाणी असलेल्या वार्षिक सप्ताह कार्यक्रमानिमित्त मनोज रंगे पाटील यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की महादेव मुंडे खून प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता मी कोणालाही सोडणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळावा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूया.
नाशिकच्या मनमाड - नांदगाव रोडवरील नागापूर शिवारातील वळणावर पीओपी घेऊन जाणारा ट्रक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यासोबत असलेला क्लिनर हा देखील जखमी झाला आहे.
चंद्रपूरच्या महापौरपदावर काँग्रेस आणि भाजपनेही दावा केल्यानेही राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 सदस्य आहेत. यात साध्या बहुमतासाठी 34 एवढे संख्याबळ आवश्यक आहे. काँग्रेसकडे 30 सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी केवळ चार सदस्य आवश्यक आहेत. बहुमताचे आकडे जुळवण्यासाठी काँग्रेसला मोठा वाव आहे. याच पक्षाचे दोन बंडखोर निवडून आले असून, बसप आणि MIM यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या चौघांना जवळ घेतल्यास काँग्रेस ड्रिम फिगर पार करू शकते. सोबतच उद्धव ठाकरे सेनेचे सहा सदस्य आहेत.
परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद सदस्यांसाठी निवडणूक होणार असून भाजप कडून आज इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. परभणीतील भाजप कार्यात या मुलाखती पार पडल्या असून. मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी भाजप कार्यात मुलखातील आले होते . भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी या मुलाखती घेतल्या असून मोठ्या प्रमाणात या मुलाखतीला इच्छुकाने उपस्थित होते
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन सदानंद दाते यांनी एक महपूर्ण बैठक घेतली आहे. तसेच पोलीस आयुक्तालय हद्दीतील कायदा सुव्यवस्था याचा आढावा घेतला आहे.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथिल चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने संपुर्ण राज्याला हादरवून टाकले होते.या प्रकरणी राज्य सरकारने विशेष सरकारी वकिल अँड उज्जवल निकम यांची नियुक्ती केली होती.या खटल्याची सोमवार पासून सुरु होणार असून,त्याचा अहवाल देण्यासाठी आले होते.खटल्याची तातडीने सुनावणी करण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.दोन महिन्याच्या आत खटल्याला सुरवात होत आहे.ही चांगली बाब असून जलद गतीने हा खटला संपवण्याचे अँड उज्वल निकम यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट..
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा 87 जागांवर ऐतिहासिक विजय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पेढा भरून केलं अभिनंदन..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नवीन विजय उमेदवारांना दिल्या शुभेच्छा..
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठा विजय दिला आहे नागरिकाचे आभार
विजयाचा आनंद आहे
जबाबदारी भान आहे
जनतेने दाखवलेला विश्वास आहे
आम्ही दाखवलेले विश्वास आहे
शहादा शहरातील कोचिंग क्लास संचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी संतापाची लाट...
घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी संघटनांचा शहादा शहरात मोर्चा.....
सांगली -
काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांची भाजपावर टीका
राज्यातल्या भाजपाला मिळालेला सत्तेचा कौल हा जनतेचा नाही, तो सत्तेच्या गैरवापराचा कौल आहे,अशी टीका काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांनी भाजपावर केली
महापालिका निवडणूक मध्ये सत्तेचा आणि पैशाचा किती गैरवापर झाला ते जनतेने पाहिला असून सांगली महापालिकेत जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिले नाही
याउलट काँग्रेसला चांगलं मताधिक्य दिले त्यामुळे भाजपाला या ठिकाणी धक्का बसलाय
काँग्रेस हा नंबर दोनचा पक्ष बनल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले
अमरावती -
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके
मतांचे विभाजन झाले त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला
पक्षाचा आम्हाला आदेश आहे की स्थानिक पातळीवर कोणाशीही बोलू नका
मी कालच वरिष्ठांना सांगितलं भाजप सोबत युती करायची असेल तर रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी आम्हाला नको
युवा स्वाभिमान सोबत असेल तर आम्ही भाजप सोबत जाणार नाही अशी भूमिका मी अधिक आधी घेतली होती
कालच आम्हाला सूचना आल्या की स्थानीक लेवल वर कोणाशीही बोलू नये
कोल्हापूर -
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबप इथल्या गावात घुसला गवा रेडा
गवारड्याने थेट घरातून घराच्या छतावर मारली उडी
गवारेडा शेजारीच असणाऱ्या शाळेत घुसल्याने विद्यार्थ्यांची पळापळ
अचानक गवारेला शाळेत घुसल्यामुळे विद्यार्थी सैरभैर पळाली
गावात भीतीच वातावरण
अमरावती -
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका
रवी राणा यांनी केला पलटवार
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे
काही महिन्यांमध्ये यशोमती ताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे - आमदार रवी राणा यांचा यशोमती ठाकूर यांच्या बाबत पुन्हा दावा .
मध्य प्रदेशातील चेनपुरा येथे 33 व्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलना चे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले असून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककलांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली आहे.या महासंमेलनासाठी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातूनही शेकडो आदिवासी बांधव दाखल झाले होते. विविध राज्यांतून आलेल्या बांधवांनी आपापल्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण लोककला आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपारिक वाद्ये, नृत्य आणि विविध प्रकारच्या वेशभूषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
आधुनिक काळात आपली मूळ संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. विविध प्रांतातील आदिवासींनी एकत्र येत आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून विविधतेतून एकता असा मोलाचा संदेश यावेळी दिला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असून महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आणली असून तब्बल ११९ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहे. तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.मात्र अस असताना पुणे शहराच्या नव्हे तर राज्याच लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक नऊ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले असून बालवडकर यांनी विजयी झाल्यावर भाजपवर जोरदार टिका करत डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये.पुणेकरांनी तुमच्याकडे बघून नव्हे तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कामाकडे बघून मतदान केलं असल्याच यावेळी त्यांनी सांगितले. भाजप नेत्याला 120 निवडून आले याचा आनंद नाही तर मी एकटा कसा निवडून आलो याचं दुःख आहे. 120 ला मी एकटा भारी आहे. चंद्रकांत दादांनी आत्तापर्यंत माझी कुठलीही काम केली नाहीत यापुढे काम लागली तर मी जाईल ते काम करतील अशी अपेक्षा नाही.
पराभव होऊ शकतो पण तत्परता, निष्ठा आणि हिंदुत्व अजून जिवंत आहे, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांची भावनिक पोस्ट
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा पराभव झाला
प्रभाग ४१ मधून नाना भानगिरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं
हिंदुत्वनिष्ठ सेवक कधीही पराभवाने खचत नाही, भानगिरे यांची पोस्ट
पराभवानंतर आता त्यांनी भावनिक पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत
बुलढाणा जिल्ह्यात सिकलसेल या आनुवंशिक आजाराचे सुमारे ३०० रुग्ण नोंदणीकृत असून, या रुग्णांची वेळोवेळी तपासणी व उपचार आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. सिकलसेल हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार असून, वेळेत निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करता येतात.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार, या आठवड्यात जिल्ह्यातील ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण भागात विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
मनपा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणूक लढणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
बारामतीतल्या बैठकीत निर्णय
महानगरपालिकेवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केल्यानंतर आज महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील पॅवेलियन हॉटेल इथ या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जे होते मनात तेच घडले मनपात अशी टॅगलाईन घेऊन महायुती आता महापालिकेचा कारभार करण्यास सज्ज झालेली आहे. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ६ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. संपूर्ण चार उमेदवाराचे पॅनल निवडून आले आहे.या पॅनलमधून निवडून आलेले संकेश भोईर यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विशेष शब्दांत शुभेच्छा दिल्या.
पॅनल क्रमांक ६ मध्ये माजी महापौर तसेच दिग्गज नगरसेवक विरोधात उभे असतानाही मतदारांनी शिवसेना उबाठा वर विश्वास दाखवत संपूर्ण पॅनल विजयी केला. हा विजय स्थानिक पातळीवर शिवसेना उबाठाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि मतदारांच्या पाठिंब्याचे स्पष्ट प्रतिबिंब मानला जात आहे.
विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल वरून संकेश भोईर व संपूर्ण विजयी पॅनलचे अभिनंदन करत, शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे कल्याण पश्चिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, आगामी काळात महापालिकेत प्रभावी भूमिका बजावण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे
सामान्य कुटुंबातील योगेशने नगरसेवक होत केला माजी आमदाराच्या पराभव
- नागपूर महानगर पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांना पराभवाचा धक्का
- भाजपचे तरुण उमेदवार योगेश पाचपोर यांनी विजय मिळवत नगरसेवकपदाची बाजी मारली
- आमदारकीनंतर पुन्हा नगरसेवक होण्याचे गजभिये यांचे स्वप्न अपूर्णच राहिले, योगेश पाचपोर ठरले जायंट किलर
- नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणारे गजभिये पुन्हा स्थानिक राजकारणात उतरले होते.
- प्रकाश गजभिये यांचा 6 हजाराहून अधिक मतांनी पराभव
आताच्या घडीची मोठी बातमी
आगामी निवडणुकीत तुतारी घड्याळाची युती
मनपा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणूक लढणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
बारामतीतल्या बैठकीत निर्णय
नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी नवी मुंबईत आले होते. निवडणुकीत भाजपचे ६५ उमेदवार विजयी झाले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी नगरसेवकांचे अभिनंदन करीत भविष्यात चांगले काम करण्याची सुचना केली.
शहराची वेगळी ओळख निर्माण होईल असे अभिनव उपक्रम राबवा . शासकीय विविध संस्थांमध्ये सध्या साडेसहाशेहून अधिक पदे रिक्त असून, सक्षम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांना न्याय देण्यात येईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अमरावती महानगरपालिकेमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 45 नगरसेवक निवडून आले होते, मात्र आता त्यांना 25 सीट्स व थांबावं लागल, त्यामुळे रवी राणा यांनी भाजपचा व्यवस्थित गेम केला अशी प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर यांनी भाजप वर टीका केली आहे.. तर आम्ही या निवडणुकीमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करू आम्हाला कुबड्यांची गरज पडणार नाही असं भाजपकडून बोलल्या गेलं होते, मात्र आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज पडणार आहे, भाजप युवा स्वाभिमान समोर लाचार होणार आहे, आणि ते लंगड सरकार बसताना दिसत आहे.. भाजपसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 19 सभा घेतल्या अनेक आमदार मंत्री या ठिकाणी प्रचारात उतरले मात्र त्यांना जनतेने नाकारल आहे,ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाली आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली..
छत्रपती संभाजीनगर :
भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर लाठ्या काठ्यांसह तुफान दगडफे
शहरातील गांधी नगरमध्ये मध्यरात्री झाली दगडफेक
भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर झाली दगडफेक
तुमच्यामुळे निवडणूक हरलो म्हणत शिंदे सेनेच्या उमेदवार मिल्लू चावरिया याच्या टोळक्याने दगडफेक केल्याचा आरोप
टोळक्याकडून झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दगडफेक प्रकरणी १४ जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देवा भाऊ हा ब्रँड महाराष्ट्रात सर्वाना माहीत झाला आहे....'महाराष्ट्रात विकासाचा खरा धुरंदर कोण आहे महाराष्ट्राचे जनतेला आता माहित झालेल आहे. तोंडाचा वाफा काढणारे रहमान डोक्यात कोण आहे.' आता महाराष्ट्राच्या जनतेला माहित झालेला आहे.परिनय फुके, भाजप नेते.
*महापालिका निवडणूक 2026*
*मुंबईत असा राहिला स्ट्राईक रेट!*
पक्ष : लढलेल्या जागा/जिंकलेल्या जागा/स्ट्राईक रेट
भाजपा : 135/89/66 टक्के
उबाठा : 160/65/40.62 टक्के
शिवसेना शिंदे : 90/29/32.22 टक्के
काँग्रेस : 151/24/15.89 टक्के
शरद पवार राष्ट्रवादी : 11/1/0.90 टक्के
मनसे : 53/6/0.86 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस : 37/3/0.81 टक्के
......
*मुंबईत अशी राहिली मतांची टक्केवारी!*
भाजपा : 45.39 टक्के
उबाठा : 27.37 टक्के
शिवसेना : 10.28 टक्के
काँग्रेस : 9.41 टक्के
मनसे : 2.91 टक्के
.....
*राज्यात पक्षांनी 2017 च्या तुलनेत असे कमाविले यश!*
भाजपा : 2017 : 1099/आता 1400
शिवसेना : 2017 : 489/आता 410 (उबाठा : 155)
काँग्रेस : 2017 : 439/आता 357
राष्ट्रवादी काँग्रेस : 2017 : 294/आता 163 (शरद पवार : 35)
मनसे : 2017 : 26/आता 12
अन्य : 2017 : 296/आता 324
अपक्ष : 2017: 89/आता 18
......
*महापालिका निवडणूक 2026 : राज्यातील स्ट्राईक रेट!*
भाजपा : 2209 उमेदवार/1400 विजयी/63.38 टक्के
शिवसेना : 1493 उमेदवार/410 विजयी/27.46 टक्के
राष्ट्रवादी : 1355 उमेदवार/163 विजयी/12 टक्के
उबाठा : 1275 उमेदवार/155 विजयी/12.15 टक्के
शरद पवार : 533 उमेदवार/35 विजयी/6.56 टक्के
काँग्रेस: 1359 उमेदवार/357 विजयी/26.27 टक्के
मनसे : 330 उमेदवार/12 विजयी/3.64 टक्के
एमआयएम: 423 उमेदवार/126 विजयी/29.78 टक्के
आम आदमी पार्टी : 455 उमेदवार/0 विजय/0 टक्के
कोल्हापूर महानगर पालिकेवर महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता महापौर कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुक नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते,माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आ.सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे.
रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रशासकीय यंत्रणा या ‘लोकशाहीच्या उत्सवा‘साठी सज्ज झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मतदानासाठी रत्नागिरी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी‘ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श‘ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण 707 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली असल्याची माहिती जीवन देसाई यांनी यावेळी दिली...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे....
शाळांनी या प्रवेश पत्रांची मुद्रीत प्रत विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळांनी दिले आहेत.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण क्रिस्टल हाऊस येथे उपस्थित राहणार आहेत .
नवी मुंबई शहरामध्ये भाजपला बहुमतात महापालिकेची सत्ता मिळालेले आहे त्यामुळे भाजपचा महापौर होणार आहे या दृष्टीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे
नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली.. इतिहासात पहिल्यांदा नांदेड महापालिकेत भाजपाचा महापौर बसणार आहे.. महापालिकेच्या एकूण 81 जागांपैकी भाजपाने तब्बल 45 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपाने ही निवडणूक स्वबळावर लढली आणि जिंकली. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.
भाजपाने 45 जागा जिंकून सत्ता मिळवली .. मात्र यात नांदेडमध्ये एमआयएम पक्ष 14 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला , काँग्रेस वंचित युतीने 15 जागा जिंकल्या , तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला चार जागा , राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या.
रायगडच्या खालापूर पोलिसांनी गुटखा तस्करांविरोधात मोठी कारवाई करत 64 लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टोल नाक्या जवळ करण्यात आली आहे. या प्रकरणी शेख रशीद रहेमान आणि गणेश वानखेडे अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर आणि गुटखा मिळून 1 कोटी 3 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
धाराशिवच्या परंडा शहरातील बीअरबारमधील घटना
बिअरबारचे मॅनेजर जनार्धन चंदर भोये व मालक बत्तीनी गौड यांच्यावर लाकडी काठी - कॅरेटने हल्ला,दोघे जखमी
मारहाणीची संपुर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद,चौघांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल
बिअरबार मालक बत्तीनी गौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वास उर्फ बापु अंकुश भानवसे,रोहीत विश्वास भानवसे, महेश मच्छिंद्र भानवसे व अशोक मच्छिंद्र भानवसे यांच्याविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल
खोपोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान झाले आहेत. पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम साबळे यांना ही संधी देण्यात आली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
16 जागेवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक आलेत निवडून..
रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थाना समोर मोठा जल्लोष..
युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी मतदारांचे मानले आभार..
अमरावतीच्या नवसारी प्रभागातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत......
अवघ्या 27 वर्षीय भाजपचे उमेदवार ऋषिकेश देशमुख यांचा तब्बल 2200 मतांनी विजय....
राष्ट्रवादीसह भाजपने केली होती या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक...
माझी निवडणूक लोकांनी हातात घेतली म्हणून माझा विजय झाला विजयानंतर ऋषिकेश देशमुख यांची प्रतिक्रिया...
अमरावती शहरातील विकास कामे सीसीटीव्हीचा मुद्दा मार्गी लावणार..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.