Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Fssai pan masala rules : तंबाखू आणि निकोटिनयुक्त गुटखा आणि पानमसाल्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्या राज्यातील सरकारने हा निर्णय घेतला जाणून घेऊयात...
Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार
Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणारmeta ai
Published On

तंबाखू आणि निकोटिनयुक्त गुटखा तसेच पानमसाला तयार करणे, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही. तंबाखूजन्य गुटखा, पानमसाल्यावर कर्नाटक सरकारनं एका वर्षाची बंदी घातली आहे. विक्री आणि साठा करणाऱ्यांविरोधातही कठोर पावलं उचलली आहेत. राज्यात अशा उत्पादनांवर एका वर्षासाठी प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. बंदी असतानाही या पदार्थांची विक्री किंवा साठा केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, ही बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे गुटखा, तंबाखू आणि निकोटिनयुक्त पानमसाल्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. या पदार्थांची विक्रीच नव्हे, तर याचा अवैध साठा करून ठेवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.

अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत, तंबाखू आणि निकोटिनयुक्त खाद्यपदार्थांच्या नियमांच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे. असे पदार्थ खुले, पाकीटबंद किंवा सॅशेमध्ये विकले जाणार असले तरी, त्यांच्यावरही निर्बंध लागू होणार आहेत. याशिवाय कोणत्याही पदार्थांमध्ये तंबाखू किंवा निकोटिन आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

दरम्यान, पान मसाल्यांच्या पॅकेजिंगमध्येही FSSAI चे विविध नियम स्पष्ट केले आहेत. पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक लॅमिनेट, अॅल्युमिनियम फॉईल आणि इतर गोष्टींबाबत नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पानमसाला उत्पादक कंपन्यांसाठी आता पॅकेजिंगवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अन्न सुरक्षा विभागाकडून दुकाने आणि गोदामांवर धाड टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्नाटकातील पानटपरी आणि इतर विक्रेत्यांचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार
भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com