Breaking : महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार! Saam Tv News
महाराष्ट्र

Breaking : महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार!

अखेरीस अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धतीवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या संदर्भातील अध्यादेश, राज्यसरकारने स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.

हे देखील पहा :

येणाऱ्या निवडणुकांसाठी महापालिकेत तीन सदस्यांचे, नगरपालिकेत दोन, तर नगर पंचायतीत एक सदस्यीय प्रभाग असणार आहेत. याबाबतचा अध्यादेश आज जारी करण्यात आला आहे. हा अध्यासादेश स्वाक्षरी साठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला असून राज्यपाल या अध्यादेशावर स्वाक्षरी करणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महापालिकेत दोन सदस्यीय प्रभाग रचना असावी अशी मागणी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादीची होती. काळ झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभागवरच शिक्कामोर्तब झाले होते. आता याबाबतचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

राम मंदिरात 40 दिवसांत 70 वेळा चोरी, SITच्या अहवालात धक्कादायक खुलासे, बड्या धेंड्यांना वाचवण्याचा डाव?

Maharashtra News Live Update: धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT