Mumbai : धक्कादायक! कोरोना लसीऐवजी दिले रेबीज चे इंजेक्शन

ठाण्यातील कळवा येथील अतकोनेश्वर नगर या कोविड सेंटर मध्ये कोविड ची लस घेण्यासाठी गेलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला चक्क रेबीज चे इंजिक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai : धक्कादायक! कोरोना लसीऐवजी दिले रेबीज चे इंजेक्शन
Mumbai : धक्कादायक! कोरोना लसीऐवजी दिले रेबीज चे इंजेक्शनSaamTvNews

मुंबई : ठाण्यातील कळवा येथील अतकोनेश्वर नगर या कोविड सेंटर मध्ये कोविड ची लस घेण्यासाठी गेलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला चक्क रेबीज चे इंजिक्शन दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी घडली. घडलेल्या घटनेनंतर पीडित व्यक्ती हा घाबरल्यामुळे काय करावे समजत नव्हते म्हणून त्याने जवळच्या शिवसेना शाखेत धाव घेतली आपल्या सोबत घडलेली घटना त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. कळव्यातील अतकोनेश्वर नगर या ठिकाणी राहणारे 40 वर्षीय राजकुमार यादव या व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर राजकुमार हे जवळच्या कोविड सेंटर मध्ये कोविडची लस घेण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांनी विचारपूस केली की माझे ऑपरेशन झाले आहे, मी लस घेऊ शकतो का? तेथील डॉक्टरांनी त्यांना लस घेऊ शकतो असा सल्ला दिला.

हे देखील पहा :

त्यानंतर राजकुमार हे लस घेण्यासाठी आत गेले असता त्यांना तेथील परिचरिकेने एका हाताच्या दंडावर लस दिली नंतर लगेचच दुसऱ्या हाताच्या दंडावर दुसरी लस दिली. दोन लस एकदम दिल्याने राजकुमार यांना शंका आली आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राजकुमार यांच्या सोबत असलेल्या एका सुशिक्षित तरुणीने त्यांना रेबिजची लस दिली गेली असल्याचे सांगितले. ही गोष्ट समजताच राजकुमार हे घाबरले आणि त्यांनी आपल्या घराजवळील असलेल्या शिवसेना शाखेत धाव घेत आपबिती सांगितली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ही संपूर्ण घडलेली घटना सांगताना राजकुमार यादव यांना अश्रू अनावर झाले. सध्या राजकुमार यादव यांची प्रकृती स्थिर आहे.

Mumbai : धक्कादायक! कोरोना लसीऐवजी दिले रेबीज चे इंजेक्शन
Nanded : खड्ड्यांमुळे महिलेची झाली रस्त्यातच प्रसुती!

परंतु, आज जी घटना माझ्या सोबत घडली आहे, ती घटना इतर कोणासोबत घडू नये यासाठी चौकशी करण्यात यावी तसेच माझ्या जीविताचे काही बरेवाईट झाले असते तर याला जबाबदार कोण? असा सवाल यावेळी यादव यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेवरून आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, या घडलेल्या घटनेनंतर महापालिकेने कडक पाऊले उचलत आरोग्य केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉ. राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती रायात यांच्यवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्व आरोग्य केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या गेल्या असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com