Eknath Shinde Cabinet Decision : शेवटच्या कॅबिनेट बैठकीत महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये प्रवेश कऱणाऱ्या पाचही टोलनाक्यावर हलक्या मोटर वाहनांना पूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा करण्यात आल्याचं समोर आले आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे. (Chief Minister Eknath Shinde big announcement in state cabinet maharashtra political updates)
विधानसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. वाशी, ऐरोली, मुलुंड,दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्रीपासूनच टोलमाफीचा आदेश देण्यात आलाय. विधानसभेच्या तोंडवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी राज्यात निर्णायांचा सपाटा सुरु आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक निर्णय आज सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असेल. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर येणा-या २४ तासात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी माहिती वरीष्ठ प्रशासकीय सूत्रांने साम टीव्हीला दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहवर दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.