Ashok Chavan announces the launch of Mumbai-Nanded Vande Bharat Express starting from August 26, connecting Marathwada faster than ever. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Nanded-Mumbai Vande Bharat Express : २६ ऑगस्टपासून नांदेड-मुंबई वंदे भारत सुरू होणार. परभणी, संभाजीनगरमार्गे धावणार. प्रवास २ तासांनी लवकर. आरामदायी, वातानुकूलित कोच व आधुनिक सुविधा असलेली ही ट्रेन असेल.

Namdeo Kumbhar

Mumbai to Nanded Vande Bharat Start Date : गेल्या काही दिवसांपासून नांदेड-परभणीकरांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर अखेर मिळाले आहे. मुंबई सीएसएमटी-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून नांदेड-संभाजीनगर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. मुंबई-नांदेड मार्गावर धावणारी ही वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनमुळे नांदेडकर आणि परभणीकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. मुंबई-नांदेड वंदे भारत कोण कोणत्या स्थानकावर थांबणार? तिकिट किती असणार? कोणत्या वेळेला कोणत्या स्थानकातून सुटणार? (Mumbai-Nanded Vande Bharat Express scheduled) याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात... (Nanded-Mumbai Vande Bharat: Timings, Stops, and Ticket Fare Details)

कोण कोणत्या स्थानकावर थांबणावर नांदेड-मुंबई वंदे भारत ? Which stations does the Nanded-Mumbai Vande Bharat train stop at?

परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण, ठाणे आणि दादार या स्थानकावर नांदेड-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. परभणी आणि नांदेड या दोन शहरातील नागरिकांना मुंबईला प्रवास करणं आता आणखी सोप्पं होणार आहे.

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट किती असेल ? What is the ticket price for the Mumbai-Nanded Vande Bharat Express?

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, एसी चेअर कारचे तिकीट १,७५० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट ३,३०० रुपये असू शकते.

मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची वेळ काय? What is the timetable for the Mumbai-Nanded Vande Bharat Express train?

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नांदेडहून सकाळी ५:०० वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई सीएसएमटीहून दुपारी १:१० वाजता सुटून रात्री १०:५० वाजता नांदेडला पोहोचेल.

Mumbai to Nanded Vande Bharat Express

नांदेडकरांचा वेळ किती वाचणार ?

वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे नांदेडकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे, पण वेळही वाचणार आहे. मुंबई-नांदेड या प्रवासाचा कालावधी सुमारे ९ तास २५ मिनिटे असेल. सध्याच्या इतर ट्रेनच्या तुलनेत २ तास कमी आहे.

नांदेड-मुंबई वंदे भारतला किती कोच असतील?

नांदेड-वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन २० डब्यांची असेल. १६ एसी चेअर कार आणि ४ एक्झिक्युटिव्ह चेअर कार डब्बे असतील. संभाजीनगरपर्यंत धावत होती, त्यावेळी या एक्सप्रेसला ८ कोच होते. पण त्यानंतर नांदेडपर्यंत विस्तार केल्यानंतर आणखी ८ डब्बे वाढवण्यात आले आहेत.

नांदेड-परभणीकरांना मुंबई आणखी जवळ -

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यामुळे मराठवाडा आणि मायानगरी आणखी जवळ आली आहे. आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या एक्सप्रेसमधील कोच वातानुकूलन, सीसीटीव्ही, वायरलेस चार्जिंग आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील. या ट्रेनमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना, विशेषतः नांदेड आणि परभणीतील नागरिकांना, मुंबईशी जलद कनेक्टिव्हिटी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT